शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बॅड न्यूज; निवृत्तीचे वय 30 वर्षे की वयाची 50 वर्षे निर्णयासाठी समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 10:59 IST

Government Employee retirement : ग्राम विकास विभाग (खुद्द) आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड मधील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे वयाच्या 50/55 वर्षापलीकडे किंवा अर्हताकारी 30 वर्षाच्या सेवेनंतर शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमावण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली आहे.

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय सेवेची 30 वर्षे किंवा वयाची 50/55 ठरविण्यासाठी ग्राम विकास विभागाने (खुद्द) समित्या नेमल्या आहेत. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

ग्राम विकास विभाग (खुद्द) आस्थापनेवरील गट-अ ते गट-ड मधील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे वयाच्या 50/55 वर्षापलीकडे किंवा अर्हताकारी 30 वर्षाच्या सेवेनंतर शासन सेवेत राहण्याची पात्रापात्रता आजमावण्यासाठी विभागीय पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभाग, दिनांक १०.०६.२०१९ च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत वयाच्या 35 व्या वर्षांपूर्वी आलेल्या गट -अ व गट-ब च्या राजपत्रित अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाची 50 वर्षे पूर्ण किंवा त्यांच्या सेवेची 30 वर्षे यापैकी जे आधी होईल त्याचे पुनर्विलोकन करण्याबाबत सूचना देण्यात आले होते. तसेच गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या वयाच्या 55 वर्षे किंवा सेवेची 30 वर्षे पूर्ण होतील त्यांच्यासाठी आदेश देण्यात आले होते. 

त्यानुसार ग्रामविकास विभागाने (खुद्द) या कर्मचाऱ्यांना पुढे सेवेत ठेवायचे की नाही यावर निर्णय घेण्यासाठी दोन समित्या नेमल्या आहेत. ही समिती पुढीलप्रमाणे असेल. 

विभागीय पुनर्विलोकन समिती (गट-अ ते गट -ब (राजपत्रित) अधिकारी)(१) सचिव/प्रधान सचिव/ अप्पर मुख्य सचिव (ग्रा.वि.व पं.रा.)(२) सह/उप सचिव, ग्रा.वि.विभाग (खुद्द आस्थापना)(३) सह/उप सचिव, ग्रा.वि.विभाग (म.वि.से. आस्थापना)(४) अवर सचिव/कार्यासन अधिकारी (ग्रा.वि.विभाग खुद्द आस्थापना)

विभागीय पुनर्विलोकन समिती (गट-ब (अराजपत्रित) ते गट-ड अधिकारी/कर्मचारी)(१) सह/उप सचिव, ग्रा.वि.विभाग (खुद्द आस्थापना)(२) सह/उप सचिव, म.वि.से आस्थापना(३) सह/उप सचिव, राज्य योजना(४) अपर सचिव/कार्यासन अधिकारी (ग्रा.वि.विभाग खुद्द आस्थापना)

या दोन्ही समित्या त्यांचा अहवाल गट-अ अधिकार्यांच्या शिफारशी अंतिम निर्णयासाठी ग्राम विकास मंत्री आणि राज्यमंत्र्यांना सोपविणार आहेत. तसेच सेवा पुनर्विलोकनानंतर मुदतपूर्व सेवानिवृत्तीच्या निर्णयाविरुध्दच्या अभिवेदनावर विचार करण्याकरीता विभागातील गट -अ (राजपत्रित) ग्रेड वेतन ७६०० पेक्षा कमी व गट-ब (राजपत्रित) तसेच मंत्रालयीन विभागातील गट-ब (अराजपत्रित). गट-क आणि गट ड मधील कर्मचाऱ्यांकरीता देखील समिती गठीत करण्यात आली आहे. 

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारीRural Developmentग्रामीण विकासministerमंत्री