आयुक्तांच्या राजीनाम्याने खळबळ!

By Admin | Updated: June 2, 2015 04:30 IST2015-06-02T04:30:09+5:302015-06-02T04:30:09+5:30

ठाणे शहराचे आयुक्त पद न मिळाल्यामुळे नाराज असलेले नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) सोमवारी राजीनामा दिल्याने

Commissioner resigns! | आयुक्तांच्या राजीनाम्याने खळबळ!

आयुक्तांच्या राजीनाम्याने खळबळ!

मुंबई : ठाणे शहराचे आयुक्त पद न मिळाल्यामुळे नाराज असलेले नवी मुंबईचे पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी भारतीय पोलीस सेवेचा (आयपीएस) सोमवारी राजीनामा दिल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. प्रसाद यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर थेट राजीनामा देण्याची वेळ आल्याने नव्या सरकारच्या काळात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘पोस्टिंग’विषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. सूत्रांनी सांगितले, की नवीन सरकारमध्ये आपल्याला किमान ठाण्याचे पोलीस आयुक्तपद दिले जाईल, अशी त्यांना आशा होती. पण त्यांना ते पद न मिळाल्याने नाराज झाले होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Commissioner resigns!