"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 13:38 IST2025-07-10T13:36:48+5:302025-07-10T13:38:06+5:30

Shambhuraj Desai vs Anil Parab: सभागृहातच शंभूराज देसाई यांनी अनिल परब यांना धमकी दिली.

"Come out, I'll show you, you're a boot..." Shambhuraj Desai got angry when Anil Parab called him a 'traitor', jumped into the Legislative Council | "बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली

"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली

मुंबईत मराठी माणसाला घरांसाठी आरक्षण मिळावे या मुद्द्यावर राज्य सरकारचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई आणि शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार अनिल परब यांच्यात सभागृहात शा‍ब्दिक चकमक झाली. मराठी माणसाला मुंबईत घरांसाठी आरक्षण मिळावे, यासाठी कायदा तयार करण्यात यावा, अशी मागणी अनिल परब यांनी केली. मात्र, यावरून वादाला सुरुवात झाली आणि शंभूराजे देसाई यांनी अनिल परबांना बाहेर ये तुला दाखवतो, अशी धमकी दिली. यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब केले.

सभागृहात बोलताना आमदार अनिल परब यांनी मुंबईत मराठी माणसाच्या घरांचा मुद्दा उपस्थित केला. "मुंबईतील प्रत्येक नवीन इमारतीत बिल्डरने ४० टक्के घरे मराठी माणसांसाठी राखीव ठेवावीत, यासाठी राज्य सरकार कायदा करणार का?" असा प्रश्न परब यांनी विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, "मुंबईत मराठी माणसाला सन्मान मिळावा, ही जशी तुमची भावना आहे तीच आमचीही भावना आहे. परंतु, २०१९ ते २०२२ या काळात तुमचे सरकार असताना हा कायदा का केला नाही? तुमच्या सरकारने मराठी माणसाकडे दुर्लक्ष केले", असे देसाई म्हणाले. 

मात्र, यानंतर अनिल परब यांचा चांगलाच पारा चढला आणि त्यांनी शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. "आमच्या सरकारमध्ये तुम्हीही मंत्री होता, मग तुम्ही तेव्हा काय करत होता? तुम्ही जेव्हा सरकारमध्ये होता, तेव्हा गद्दारी कशी करायची हे ठरवत होता", असे परब म्हणाले. परब यांनी गद्दार शब्दाचा उल्लेख केल्याने शंभूराज देसाई प्रचंड संतापले. "तू गद्दार कोणाला बोलतो. तू बूट चाटत होता. बाहेर ये तुला दाखवतो", अशी धमकी त्यांनी परब यांना दिली. यावरून सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी  सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.

Web Title: "Come out, I'll show you, you're a boot..." Shambhuraj Desai got angry when Anil Parab called him a 'traitor', jumped into the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.