शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

कोरोना परिस्थिती सुधारणा झाल्यानंतरच महाविद्यालये सुरू होणार : उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 14:28 IST

महाविद्यालयांकडून शिकवला जाणारा ऑनलाइन शिक्षण ग्राह्य धरणार

ठळक मुद्देपुण्यात ऑनलाइन ऑफलाईन परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदविद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क आकारणी करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई केली जाईल.

पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत महाविद्यालयांकडून शिकवला जाणारा ऑनलाइन अभ्यासक्रम ग्राह्य धरला जाणार असून त्या आधारेच परीक्षा घेतल्या जातील. मात्र ,कोरोना परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतरच प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू होतील, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी स्पष्ट केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तर्फे घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन ऑफलाईन परीक्षांचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उदय सामंत बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने , विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे आदी उपस्थित होते.             सामंत म्हणाले, पुणे विद्यापीठातर्फे सुमारे २ लाख विद्यार्थ्यांची ऑनलाइन पद्धतीने तर ५० हजार विद्यार्थ्यांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठाने परीक्षेसाठी आवश्यक असणारी सर्व तयारी केली आहे. पुणे, अहमदनगर , नाशिक जिल्ह्यातील परीक्षा सुरळीतपणे पार पाडाव्यात यासाठी जिल्हा प्रशासन व विद्यापीठ प्रशासन यांच्यातील समन्वयासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. विद्यापीठात घेण्यात आलेल्या बैठकीत तीनही जिल्ह्यातील प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.राज्यातील प्राध्यापकांची व तासिका तत्वावरील (सीेएचबी) पदांची भरती लवकरच केले जाईल. तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या भरतीसाठी नेट- सेट पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर इतर उमेदवारांचा विचार केला जाईल. तसेच कोरोनामुळे पुणे विद्यापीठाने शुल्कवाढ मागे घेतली आहे.त्यामुळे एकाही संलग्न महाविद्यालयाने शुल्कवाढ करू नये. जिमखाना शुल्क, डेव्हलपमेंट शुल्क आदी प्रकारचे शुल्क महाविद्यालयांना करता येणार नाही. केवळ शैक्षणिक शुल्क आकारता येईल. विद्यार्थ्यांकडून वाढीव शुल्क आकारणी करणाऱ्या शैक्षणिक संस्थांवर कारवाई केली जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

फिजिकल डिस्टंसिंगचाउडाला फज्जा....

कोरोनातून बरे झाल्यानंतर उदय सामंत यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली. मात्र, विद्यापीठात त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांचा व विविध विद्यार्थी संघटनांचा गराडा पाहायाला मिळाला. त्यामुळे फिजिकल डिस्टंसिंग फज्जा उडाला.

टॅग्स :PuneपुणेUday Samantउदय सामंतEducationशिक्षणcollegeमहाविद्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याStudentविद्यार्थी