विदर्भात येणार थंडीची लाट; मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2019 05:45 IST2019-01-30T05:43:39+5:302019-01-30T05:45:33+5:30

राज्यातील शहरांच्या किमान तापमानात उल्लेखनीय घट

Cold wave sweeps Vidarbha; Rain sign of Marathwada, Central Maharashtra | विदर्भात येणार थंडीची लाट; मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा

विदर्भात येणार थंडीची लाट; मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा

मुंबई : मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १९.२ अंश सेल्सिअस तर राज्यात सर्वांत कमी किमान तापमान यवतमाळ ६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यातील शहरांच्या किमान तापमानात उल्लेखनीय घट नोंदविण्यात येत असतानाच दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

३० जानेवारी रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल तर काही ठिकाणी दिवसाही गारवा राहील. ३१ जानेवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. १ फेब्रुवारी रोजी मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. २ फेब्रुवारी रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. तर बुधवारसह गुरुवारी मुंबईचे किमान तापमान ३२, २० अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Web Title: Cold wave sweeps Vidarbha; Rain sign of Marathwada, Central Maharashtra