शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्था निवडणूक सुधारित आदेश काढणार

By admin | Updated: December 16, 2014 02:30 IST

ड वर्ग सहकारी संस्थांच्या निवडणूक खर्चासंदर्भात संभ्रम असल्याने याबाबत लवकच सुधारित सुस्पष्ट आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले.

नागपूर: ड वर्ग सहकारी संस्थांच्या निवडणूक खर्चासंदर्भात संभ्रम असल्याने याबाबत लवकच सुधारित सुस्पष्ट आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिले.दरम्यान यासंदर्भात सदस्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंगळवारी सहकार आयुक्तांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात येईल व संबंधित सदस्यांना बोलविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.विधानसभेत मंजूर झालेले महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक २०१४ हे सोमवारी चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत सादर केले. या विधेयकावरील चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी काही नियमांबाबत शंका उपस्थित केल्या. मुळातच आर्थिक अडचणीत असलेल्या संस्थांना त्यांच्या निवडणूक खर्चासाठी सहकार विभागाकडून २० ते ३० हजार रुपये अनामत रक्कम मागितली जाते. ही रक्कम संस्थांनी कशी आणि कोठून द्यावी, याकडे शेकपाचे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले. सहकार कायद्यातील नव्या घटना दुरुस्तीमुळे बिगर कर्जदारांनाही मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने त्यांच्याच हाती या संस्था जाण्याचा धोका आहे, अशी भीती राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीचेच प्रकाश बिनसाळे आणि राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित केला. अशा प्रकारच्या मुंबईतील ७० हजार संस्थांच्या निवडणुका अद्याप झाल्या नाहीत आणि निर्धारित मुदतीत त्या होणे शक्य नाही, असे नार्वेकर म्हणाले.क आणि ड वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या ३१ डिसेंबर पर्यंत झाल्या नाहीत तर त्या पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत घेण्याची तरतूद या कायद्यात आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. ज्या संस्था त्यांच्या सर्वसधारण सभेत एकमताने निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करणार असतील तर त्यांना अनामत रक्कम देणे बंधनकारक नाही. याबाबत काही संभ्रम असेल तर सुधारित स्पष्ट आदेश लवकरच काढण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)