शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

सहकारमंत्र्यांच्या कारखान्याचा साखर उतारा साडेआठ टक्क्यांच्या आत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 9:12 PM

केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने दहा टक्के साखर उताऱ्यांसाठी २७५० रुपये प्रतिक्विंटल एफआरपीची शिफारस केली आहे.

ठळक मुद्देसरासरी उत्पादन खर्च वाढणार : ३९ कारखान्यांचा साखर उतारा दहा टक्क्यांच्या आत

पुणे : राज्यातील तब्बल ३९ साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा दहा टक्क्यांच्या खाली आहे. यातील १५ कारखाने एकट्या सोलापुर जिल्ह्यातील आहेत. विशेष म्हणजे राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगल कारखान्याचा साखर उतारा साडेआठ टक्के देखील नाही. उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराच्या (एफआरपी) नियमामुळे ऊस उत्पादकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्याची हमी असल्याने, एफआरपीचे पैसे देण्यासाठी साखर उतारा कमी असणाºया कारखान्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.  केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने दहा टक्के साखर उताऱ्यांसाठी (एक क्विंटल ऊस गाळपातून होणारे साखर उत्पादन) २७५० रुपये प्रतिक्विंटल एफआरपीची शिफासर केली आहे. तर, त्या पुढील प्रत्येक टक्क्यासाठी २७५ रुपये देण्यात येतील. तर, साडेनऊ टक्क्यांपेक्षा साखर उतारा कमी असणाऱ्या कारखान्यांना त्या प्रमाणात दर कमी दिला जावा असे आयोगाचे म्हणणे होते. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहचू नये यासाठी साडनेू टक्क्यांखाली कितीही उतारा असला तरी २६१.२५ रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे टनाला २६१२ रुपये द्यावे लागतील. राज्यातील स्थिती पाहता ३९ साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा दहा अथवा त्यापेक्षा खाली आहे. त्यातील १९ कारखान्यांचा साखर उतारा हा साडेनऊ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर, ९ टक्क्यांपेक्षा साखर उतारा कमी असणारे ७ कारखाने आहेत. त्यातील दोन कारखाने हे सहकार मंत्र्यांशी संबंधित आहेत. कोणत्याही कारखान्याला एफआरपीची रक्कम देण्यासाठी साखर हा मुख्य स्त्रोत असतो. त्यानंतर इथेनॉल, मड प्रेस, मळी, सहवीज प्रकल्प असे उपपदाथार्तील घटकही एफआरपीची रक्कम उभारण्यासाठी हातभार लावत असतात. ज्या कारखान्यांचा साखर उतारा दहा टक्के आणि त्या खाली आहे, त्यांना शंभर किलोमागे साडेआठ ते दहा किलो साखर मिळते. उर्वरीत कारखान्यांना ती साडेदहा ते १३ किलो पर्यंत मिळते. विशेषत: कोल्हापुरमधील साखर उतारा १२ ते १३ टक्क्यांदरम्यान आहे. पुण्याचा साखर उतारा साडेअकरा टक्क्यंदरम्यान दरम्यान येतो. म्हणजेच साडेआठ ते दहा टक्के साखर उतारा असलेल्या कारखान्यांचा उत्पादन खर्च हा उर्वरित कारखान्यांपेक्षा अधिक आहे. या कारखान्यांना किमान २६१२ रुपये प्रतिटनापर्यंत दर बंधनकारक आहे. त्यामुळे कमी साखर उतारा असलेल्या कारखान्यांना एफआरपीसाठी कसरत करावी लागणार असल्याचे साखर क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.  

टॅग्स :PuneपुणेSubhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकारFarmerशेतकरी