Independence Day 2020 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण, 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा दिला नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 11:19 AM2020-08-15T11:19:24+5:302020-08-15T11:37:35+5:30

Independence Day 2020 : डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

CM Uddhav Thackeray Hoists National Flag on 74th Independence Day | Independence Day 2020 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण, 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा दिला नारा

Independence Day 2020 : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण, 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा दिला नारा

Next

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे देखील उपस्थित होत्या. डॉक्टर्स, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच 'जय जवान जय किसान, जय कामगार'चा नारा देखील दिला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटात पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे. पोलिसांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान असल्याचं देखील म्हटलं आहे. तसेच खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचं हित जोपासलं जाईल असं म्हणत  'जय जवान जय किसान, जय कामगार'चा नारा दिला. यासोबतच कामगारांचे हित जोपासण्यास प्राधान्य दिलं जाणार असल्याचं देखील म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासियांची सेवा केली आहे. त्या सर्वांना मी नमन करतो असं देखील पंतप्रधानांनी म्हटलं आहे. याच दरम्यान पंतप्रधानांनी कोरोना लसी संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे.  

"कोरोनाची लस कधी हा सर्वांना प्रश्न पडला आहे, वैज्ञानिक कठोर मेहनत करत आहेत, भारतात तीन लसी विविध टप्प्यात असून प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार" असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशवासियांना संबोधित करताना देशातील संशोधक कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. भारतातील तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत. संशोधकांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर मोठया प्रमाणावर लसीचे उत्पादन सुरू होईल. कमीत कमी वेळेत कोरोनावरील लस प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार आहे असं मोदींनी म्हटलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! देशातील रुग्णसंख्येने गाठला नवा उच्चांक; 25 लाखांचा टप्पा केला पार

CoronaVirus News : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण 

Independence Day 2020 : "देशात तीन लसी विविध टप्प्यात, प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवण्याची रूपरेखा तयार"

Independence Day 2020 : "आत्मनिर्भर भारत एक शब्द नाही, 130 कोटी देशवासियांसाठी मंत्र"

सुशांतच्या आत्महत्येच्या दिवशी रिया 'या' व्यक्तीशी बोलली 1 तास, जाणून घ्या कोणाला केले शेवटचे 5 कॉल

"कोरोनाची लस सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारने रणनीती आखण्याची गरज"

Web Title: CM Uddhav Thackeray Hoists National Flag on 74th Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.