शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मुख्यमंत्रीच तयार करताहेत शिवसेनेची यादी; उद्धव ठाकरेंच्या दाव्याने भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 15:00 IST

भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशावेळी उद्धव यांची माहिती

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेनेची युती होणार का, 'फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला डावलून भाजपाने दिलेली कमी जागांची ऑफर शिवसेना स्वीकारणार का, यावरून उलटसुलट चर्चा सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कभी हां, कभी ना, मनसेचं काही ठरेना; राज ठाकरेंची बैठक ठोस निर्णयाविना!

'युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहेत. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शिवसेनेची यादीही तयार करायला सांगितली आहे. त्यांच्याकडून ती आली की आम्ही आमच्या नेत्यांसमोर ठेवू आणि त्यावर निर्णय घेऊ', अशी युतीच्या जागावाटपाची अजब नीती उद्धव यांनी सांगितली. उद्धव यांच्या या विधानाचे दोन अर्थ काढले जाऊ शकतात. भाजपा-शिवसेनेत सगळं अगदी सामोपचाराने सुरू आहे, असं भासवण्याचा त्यांचा हा प्रयत्न असू शकतो. मात्र त्याचवेळी, 'मोठ्या भावा'च्या रुबाबात भाजपा नेते त्यांना हवं तेच शिवसेनेवर थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून मग त्यांनाच यादी करायला सांगितली, असा दुसरा अर्थही यातून निघतो. त्यातला कुठला अर्थ योग्य हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.   खाकीतला माणूस दिसणार खादीत; प्रदीप शर्मा आज करणार शिवसेनेत प्रवेश 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार भास्कर जाधव यांनी आज 'घरवापसी' केली. राष्ट्रवादीचं घड्याळ काढून त्यांनी 'शिवबंधन' बांधलं. 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा शिवसेना प्रवेश झाला. 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' म्हणून ओळखले जाणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्माही आज शिवसेनेचा झेंडा हाती घेणार आहेत. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागलीय, तसं भाजपा-शिवसेनेतील 'इनकमिंग'ला वेग आल्याचं पाहायला मिळतंय.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा