भिवंडीत गटाराच्या मेनहोल पडलेल्या महिलेचा नागरिकांनी वाचवला जीव; टोल कंपनीचा दुर्लक्षितपणा चव्हाट्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 06:44 PM2021-06-18T18:44:53+5:302021-06-18T18:45:57+5:30

भिवंडी शहरासह ग्रामीण भागात गुरुवार पासून पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले आहे.

citizens save the life of a woman who fell into a manhole in Bhiwandi | भिवंडीत गटाराच्या मेनहोल पडलेल्या महिलेचा नागरिकांनी वाचवला जीव; टोल कंपनीचा दुर्लक्षितपणा चव्हाट्यावर 

भिवंडीत गटाराच्या मेनहोल पडलेल्या महिलेचा नागरिकांनी वाचवला जीव; टोल कंपनीचा दुर्लक्षितपणा चव्हाट्यावर 

Next

नितिन पंडीत

भिवंडी: भिवंडी शहरासह ग्रामीण भागात गुरुवार पासून पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले आहे. त्यातच शहर व ग्रामीण भागातील अनेक सखल भागात पावसाचे पाणी साचून अनेक रस्ते जलमय झाले होते. तालुक्यातील पूर्णा राहणाळ हद्दीत रस्त्यावर एका मोठ्या गटाराच्या मेनहोलमध्ये अचानक एक महिला पडल्याने त्या महिलेला रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तिला  सुखरूप बाहेर काढून तिचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. विषेश म्हणजे भिवंडी ठाणे महामार्गावर टोल कंपनीकडून मोठ्या प्रमाणात टोल वसुली केली जाते मात्र रस्त्याच्या दुरावस्थेकडे कंपनीचे लक्ष जात नसल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना या मार्गावर घडत असूनही कंपनीसह संबंधित शासकीय अधिकाऱ्यांचे या महामार्गाच्या दुरुस्तीकडे पुरता दुर्लक्ष होत आहे. 

भिवंडी ठाणे महामार्गावरील पूर्णा येथील एका पेट्रोल पंपा बाहेर रस्त्यावर मोठ्याप्रमाणात पावसाचे पाणी साचले होते. त्यातच रस्त्यालगतच असलेल्या मोठ्या गटाराच्या मेनहोल  न दिसल्याने ही महिला पाण्यातून वाट काढत होती. त्याचवेळी या महिलेचा अंदाज चुकल्याने महिला त्या मोठ्या मेनहोलमध्ये पडून गळ्या एवढ्या पाण्यात डुबत असल्याचे नागरिकांना दिसताच ही महिला वाहून जाण्याच्या अगोदरच तेथून प्रवास करणार्‍या नागरिकांनी त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले आहे. दुसरीकडे एका कार मधील व्यक्तीने हा सर्व प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करून या रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना सावध करण्यासाठी त्याने व्हायरल केले. मात्र या महिलेच्या पायाला दुखापत झाली असून ही महिला सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: citizens save the life of a woman who fell into a manhole in Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app