शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

'अंधश्रद्धा निर्मूलन संस्थे'ची सीआयडी चौकशी करा - सनातन

By admin | Updated: October 19, 2015 18:47 IST

नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यांच्या संस्थेची सीआयडी चौकशी करावी

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. १९ - नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यांच्या संस्थेची सीआयडी चौकशी करावी, सगळा भ्रष्टाचार बाहेर येईल, असा आरोप सनातन प्रभातचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे. या प्रकरणी कारवाईसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान सनातन जोरदार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगली येथील पत्रकार परीषदेत सांगितले . दाभोलकर खून प्रकरणी जशी सनातनची चौकशी झाली तशी श्याम मानव यांच्यासह त्यांच्या बरोबर असणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. श्याम मानव हे मानसिक रोगी असून त्यांना आता विश्रांतीची गरज असल्याचा टोला अभय वर्तक यांनी लगावला आहे. हिंदू संघटनांना बदनाम करण्याचे मोठे षडयंत्र करण्यात आले आहे. यामागे शरद पवारांसारखे नेते आहेत, असाही आरोप अभय वर्तक यांनी केला आहे.भाजप सरकारच्या काळात आमच्यावर कारवाई होणार नाही ही अपेक्षा आहे. जर या ठिकाणी काँग्रेस सरकार असते तर आमच्यावर बंदी घातली असती. हिंदू विरोधी टीका करून लेखन केल्यामुळेच पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना पुरस्कार मिळाले आहेत. हे फक्त पुरस्कार परत करत आहेत. पण यांना १० टक्के कोट्यातून शासनाने दिलेली घरे हे साहित्यिक परत का देत नाहीत ? पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.