शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत २ जूनपासून प्रवेश सुरु

By admin | Updated: May 29, 2014 00:11 IST

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या २०१५ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे.

मुंबई : ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या २०१५ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गात प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. या वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनी २ जून ते २० जून २०१४ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत पदवी परीक्षेची गुणपत्रिका (सर्वसाधारण वर्ग ५५टक्के व राखीव वर्ग ५० टक्के गुण आवश्यक), अधिवास प्रमाणपत्र (डोमेसाईल सर्टिफिकेट), शाळा सोडल्याचा दाखला (स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट), आवश्यक असल्यास जातीचे प्रमाणपत्र आणि स्टॅँम्प साईज छायाचित्रांच्या दोन प्रतींसह संस्थेकडील विहित नमुन्यात अर्ज करावा. टपालाद्वारे, कुरिअरद्वारे तसेच वेबसाईटवरुन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.या मार्गदर्शन वर्गासाठीची प्रवेश परीक्षा २९ जून २०१४ रोजी सकाळी १०.३० ते १२ वेळेत बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे येथे होईल. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर सामान्य अध्ययन या विषयाचीही परीक्षा असेल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार्‍या विद्यार्थ्यांची यादी १० जुलै २०१४ रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येईल. त्यानंतर, १५,१६,१७ जुलै, २०१४ या तीन दिवशी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतील.ही संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यावर २५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाईल. लेखी चाचणी व मुलाखतीद्वारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना केवळ सलग दोन वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेस बसण्यासाठी हा प्रवेश असेल. कोणत्याही कारणास्तव प्रवेश नाकारण्याचे अधिकार संस्थेस राहतील.अधिक माहितीसाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र भूषण, ति.डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी ग्रंथालय इमारत, वेदान्त कॉम्प्लेक्स समोर, कोरस रोड वर्तकनगर ठाणे येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कार्यालयीन वेळेत येऊन संपर्क साधावा. (प्रतिनिधी)..........................