शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
3
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
6
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
7
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
8
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
9
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
10
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
11
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
12
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
13
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
14
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
15
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
16
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
17
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
18
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
19
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
20
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

भावासाठी राखी आणणाऱ्या चिमुकलीला कारने चिरडले

By admin | Updated: August 17, 2016 21:18 IST

राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी जात असलेल्या आठ वर्षीय बालिकेला भरधाव कारने चिरडले.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 17 - राखी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी जात असलेल्या आठ वर्षीय बालिकेला भरधाव कारने चिरडले. या भीषण अपघातात तिचा अंत झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी चिकलठाणा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जालना रोडवर घडली. अनुष्का भगवान दाभाडे (८, रा. शहानगर, चिकलठाणा) असे या बालिकेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शहानगर येथील भगवान दाभाडे यांना आठ वर्षांची अनुष्का आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. १८ आॅगस्ट रोजी राखी पौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने पाच वर्षांच्या लहान भावासाठी राखी खरेदी करण्यासाठी तिची आई, आजी आणि चुलता शांतीलाल दाभाडे हे अनुष्कासह बुधवारी दुपारी चिकलठाणा येथे आले होते. तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील जालना रोडवर असलेल्या सलीम कुरेशी यांच्या हॉटेलजवळ अनुष्का आईसह थांबली होती. तर तिची काकू, आजी आणि चुलता शांतीलालसह रस्ता ओलांडून राखीचे दुकान कोठे आहे हे पाहण्यासाठी गेले. त्याच वेळी अनुष्काही रस्त्याच्या शेजारी उभी असतानाच धूत हॉस्पिटलकडून जालन्याकडे वेगाने जाणाऱ्या कारने तिला चिरडले. त्यानंतर तिला उडविणारा कारचालक घटनास्थळी न थांबता सुसाट वेगाने निघून गेला. हा अपघात एवढा भीषण होता की, अनुष्काच्या डोक्याला जबर मार लागल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. हा अपघात घडताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. रस्ता ओलांडून खरेदीसाठी गेलेले शांतीलाल दाभाडे आणि अन्य नातेवाईकही धावले. तेव्हा आपल्याच अनुष्काला वाहनाने उडविल्याने ती गंभीर जखमी झाल्याचे त्यांना दिसले. त्यांनी तिला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागात उपचार सुरू असताना सायंकाळी ४.१५ वाजेच्या सुमारास अनुष्काची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. चिमुकल्या भावाला राखी बांधण्याची इच्छा अपुरीच राहिलीराखी पौर्णिमेच्या दिवशी लहान भावाला आपल्या आवडीची राखी बांधायची तिची इच्छा होती. त्यामुळे ती हौशीने राखी खरेदीसाठी आई आणि अन्य नातेवाईकांसोबत चिकलठाणा येथे गेली होती. काळाने तिच्यावर घाला घातल्याने चिमुकल्या भावाला राखी बांधण्याची तिची इच्छा अपूर्णच राहिली. या घटनेने दाभाडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.