शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

तेलाचे चटके देऊन चिमुकलीची हत्या

By admin | Updated: December 3, 2014 09:20 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी चिंचोली औद्योगिक वसाहतीत आलेल्या एका जोडप्याच्या पाच वर्षीय मुलीला प्रियकराने दारूच्या नशेत उकळत्या तेलाचे चटके देऊन तिचा निर्घृण खून केला.

सोलापूर : पोटाची खळगी भरण्यासाठी चिंचोली औद्योगिक वसाहतीत आलेल्या एका जोडप्याच्या पाच वर्षीय मुलीला प्रियकराने दारूच्या नशेत उकळत्या तेलाचे चटके देऊन तिचा निर्घृण खून केला. चिंचोली औद्योगिक वसाहतीतील धर्मराज नगरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे अख्खे धर्मराजनगर हळहळले. आरुषी ईश्वर वंजारी (५) असे खून झालेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अडीच वर्षांपूर्वी गोंदिया येथून ईश्वर वंजारी हा पोटाची खळगी भरण्यासाठी आपली पत्नी संगीता, आरुषी (वय-५) आणि अंजली (वय-६) यांना घेऊन चिंचोली औद्योगिक वसाहतीत आले होते. वसाहतीतील धर्मराज नगरात त्यांनी भाड्याने घरही घेतले होते. ईश्वर आणि संगीता एका कारखान्यात काम करीत आपल्या संसाराचा गाडा हाकत होते. दरम्यान, याच भागातील शिवाजी भालेराव (३०) याने संगीताबरोबर प्रेमसंबंध जुळविले. सहा महिन्यांपूर्वी शिवाजीने ईश्वरला मारहाण करून तेथून हाकलून दिले. त्यानंतर शिवाजी हा संगीता आणि तिच्या दोन मुलींसमवेत राहत होता. मंगळवारी सकाळी दोघे नेहमीप्रमाणे गॅस कंपनीत कामाला गेले. शिवाजी हा काही वेळाने घरी आला. पुन्हा दुपारी बारा-साडेबाराच्या सुमारास शिवाजी कंपनीत जाऊन संगीताला घरी आणले. त्यावेळी दोन्ही मुली घरात खेळत होत्या. दुपारी संगीता पुन्हा कामावर गेली तर अंजली खेळण्यासाठी बाहेर गेली. दरम्यान, शिवाजीने कढईत तेल ओतून ते गरम केले. तेलात चाकू बुडवून आरुषीच्या अंगावर चटके देत होता. बराच वेळ चटके दिल्यानंतर त्याची राक्षसी वृत्ती काही शांत झाली नाही. शेवटी बेलण्याने तिच्या डोक्यावर प्रहार करीत तिचा जागीच खून केला. त्याने मुलीला इतके चटके दिले की मृत आरुषिचे शरीर पूर्णत: काळे-निळे पडले होते. घटनेचे वृत्त समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा डुबुले, मोहोळचे पोलीस निरीक्षक सूरज बंडगर आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आरोपी शिवाजी भालेराव यास अटक केली असून, रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी सुरु होती.