मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता निर्णय घ्यायला शिकावं; प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 17:45 IST2020-08-06T17:45:32+5:302020-08-06T17:45:56+5:30

जातीचा नेता होऊ शकतो,धर्माचा नेता होऊ शकतो पण आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता व्हावे....

Chief Minister Uddhav Thackeray should learn to make decisions now; Advice given by Prakash Ambedkar | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता निर्णय घ्यायला शिकावं; प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आता निर्णय घ्यायला शिकावं; प्रकाश आंबेडकरांनी दिला सल्ला

ठळक मुद्दे...अन्यथा वंचित बहुजन विकास आघाडी 10 तारखेनंतर रस्त्यावर उतरेल

पुणे : राज्य शासनाचा कारभार आजच्या घडीला रामभरोसे सुरू आहे..कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात राज्य सरकार जबाबदारीपूर्वक कोणतेही निर्णय घेताना दिसत नाही..सर्व निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयावर सोडले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझं एवढंच म्हणणं आहे की निर्णय घ्यायला शिका,जातीचा नेता होऊ शकतो,धर्माचा नेता होऊ शकतो पण आता उद्धव ठाकरे यांनी राज्याचा नेता व्हावे असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले, कोविडचा परिणाम आहे की नाही याची चर्चा आता जनतेने करावी.इतर देशात जो लॉकडाऊन सुरू आहे त्याची कॉपी आपण करतो की काय अशी शंका येतेय. सरकारकडून अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत.त्याचप्रमाणे कोरोना काळात पंतप्रधान कार्यालयापासून ते जिल्हा पातळीवर अशा सर्वत्र चालढकल करणे सुरू आहे. कोरोना संकटात राज्य सरकारने एक वेळापत्रक ठरवून द्यावं की, या दिवशी सर्व व्यवहार सुरू होतील. 

सरकारने कोविड कोविड करणं थांबवावे. आणि फक्त मोबाईलच्या कॉलरट्यून वर देशात अनलॉक आहे म्हणून सांगू नका, प्रत्यक्षात ते लागू करावे. शासनाने आता कोरोनातून बाहेर पडावे आणि सर्व व्यवहार सुरू करावेत..अन्यथा 10 तारखेनंतर वंचित बहुजन आघाडी राज्यसरकार विरोधात रस्त्यावर उतरेल, अशा तीव्र शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी एकप्रकारे राज्य सरकारला गंभीर इशाराच दिला आहे.

Read in English

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray should learn to make decisions now; Advice given by Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.