शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवन प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी

By admin | Updated: July 5, 2016 21:26 IST

दादर पूर्वेकडील आंबेडकर भवन इमारत पाडण्याची घटना पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय लांच्छनास्पद असल्याची टीका विचारवंत आणि लेखकांनी केली आहे.

ऑनलाइन  लोकमतमुंबई, दि. ५  : दादर पूर्वेकडील आंबेडकर भवन इमारत पाडण्याची घटना पुरोगामी महाराष्ट्राला अतिशय लांच्छनास्पद असल्याची टीका विचारवंत आणि लेखकांनी केली आहे. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी माफीमागण्याची मागणी करत डॉ. कुंदा प्र. नी. यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.डॉ. कुंदा यांनी सांगितले की, राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन येथील स्मारक खरेदी केले. शिवाय इंदू मिल येथेही बाबासाहेबांचे भव्यदिव्य स्मारक उभे करण्याची घोषणा केली. मात्र ज्या जागेवर प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वावर होता, अशी प्रेसची इमारत जमीनदोस्त करण्याच्या कृत्याला सरकारने अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे. कारणमुख्यमंत्र्यांनी १४ एप्रिल २०१६ रोजी आंबेडकर भवनाच्या जमिनीवरील प्रस्तावित इमारतीचा शुभारंभ केला आणि ६० कोटींचा निधी देखील जाहीर केला.याचाच अर्थ या प्रस्तावित प्रकल्पाची संपूर्ण आखणी सरकारच्या संगनमताने झाली आहे. त्यामुळे घाईघाईने जागेचा ताबा मिळविण्यासाठी रातोरात आंबेडकर भवनाचा ऐतिहासिक वारसा जमीनदोस्त करण्याच्या मुजोर कृत्याला सरकारचजबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, म्हणून विवध विचारवंत, लेखक आणि कार्यकर्त्यांनी एक सह्यांचे निवेदन सरकारला दिले आहे. त्यामध्ये राज्याचे माहिती आयुक्त यांची आयुक्त पदावरून हकालपट्टी करण्याची मागणीकरण्यात आलेलीी आहे. शिवाय ज्यांनी हे कृत्य केले त्यांना त्वरित अटक करून कारवाई करावी, असे आवाहन केले आहे. बाबासाहेबांच्या सर्व वास्तू या जनतेसाठी ऐतिहासिक दस्तऐवजच आहेत, त्यामुळे त्या सर्व चळवळीचे आधारकेंद्रआहेत. त्यात कोणत्याही सामान्य कार्यकर्त्याला येण्याजाण्यास मज्जाव केला जात नसे. त्यामुळे त्यांच्या कार्यभूमीवर पुढे काय व्हावे? आणि त्यांच्या कार्याच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने काय केले पाहिजे? हे पारदर्शकपद्धतीने जनसुनावणी घेऊन ठरवावे. ते सांगण्याचा अधिकार जनतेचाच आहे.........................ऐतिहासिक दस्तऐवज पुनर्स्थापित कराआंबेडकर भवन जमीनदोस्त केल्यानंतर मातीत गाडले गेलेले सगळे ऐतिहासिकदस्तऐवज बाहेर काढून काळजीपूर्वक पुनर्स्थापित करण्याची मागणीही निवेदनातकरण्यात आली आहे. शिवाय ऐतिहासिक वस्तू चोरून नेणाऱ्यांवर दरोडेखोरीचागुन्हा दाखल करण्याचे आवाहन केले आहे........................ज्येष्ठ लेखक, विचारवंतांचा निवेदनास पाठिंबाउर्मिला पवार, अर्जुन डांगळे, जयंत पवार, जतीन देसाई, संजय पवार,डॉ.कुंदा प्र. नी, प्रा. आशालता कांबळे, डॉ. श्रीधर पवार, आनंद पटवर्धन,रमेश पिंपळे, स्वातीजा मनोरमा, डॉ. चयनीका शहा, संध्या गोखले, सुरेशसावंत, सुनील कर्णिक, प्रा. कुमुद पावडे, प्रा. अर्चना हातेकर, प्रा.संगीता ठोसर, उषा आंभोरे, कविता मोरवणकर, प्रा. रेखा मेश्राम, राजू जाधव,डॉ. भारत पाटणकर, कॉ. प्रकाश रेड्डी, कॉ. सुबोध मोरे, अनिल सावंत, कॉ.राजन बावडेकर या दिग्गज आणि ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि आंबेडकरी चळवळीतीलनेते व कार्यकर्त्यांनी निवेदनाला पाठिंबा दिला आहे.