शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी केली महादेव जानकरांची कानउघाडणी !

By admin | Updated: October 14, 2016 08:28 IST

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

यदु जोशी

मुंबई, दि. ११ -  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या दसरा मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांबद्दल अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची चांगलीच कानउघाडणी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ‘आपण राज्याचे जबाबदार कॅबिनेट मंत्री आहात. जाहीररीत्या अशी भाषा वापरणे योग्य नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेच काय इतर कोणाहीबद्दल आपल्याकडून अशी विधाने होता कामा नये’, अशी समज मुख्यमंत्र्यांनी जानकर यांना आज बोलावून दिल्याचे समजते. आपल्या विधानांनी सरकारबद्दलचा चांगला मेसेज समाजामध्ये जातो का, याचा विचार सरकारमधील प्रत्येकानेच करण्याची आवश्यकता आहे. एकानेही वादग्रस्त विधाने केली तर त्यामुळे सरकारची अडचण होते, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी मांडली. यानंतर जानकर यांनी लगेच दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन माध्यमांकडे पाठवले.

जानकर यांचे स्पष्टीकरण मी कोणाला शिवी दिलेली नाही. भ्रष्ट मार्गाने पैसे कमावणारे व त्यावर राज्य करणाऱ्यांना जो ग्रामीण शब्द रुढ आहे. वाटल्यास शब्दकोशांत तो तपासावा. खंडेरायाची शपथ, मी गरिबांचा प्रतिनिधी आहे. बलाढ्यांशी लढा देतो, पण संस्कृतीने गरीब नाही. मी कोणाला वैयक्तिक दुखावण्यासाठी ते बोललो नाही. विपर्यास झाला हे मात्र वाईट. अर्थ चुकीचा लावल्याने लोकांचे मन कलुषित झाले असल्यास मी खेद व्यक्त करतो, असे निवेदन जानकर यांनी आज जारी केले.