शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'योगेश कदम जे बोलले, त्याला...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कान टोचत काय दिला सल्ला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:56 IST

Yogesh kadam swargate case: गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाबद्दल केलेल्या एका विधानाने वाद उभा राहिला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. 

Devendra fadnavis Yogesh Kadam News: स्वारगेट बलात्कार घटनेवर बोलताना राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी पीडितेकडून कोणताही विरोध झाला नसल्याचे म्हटले. त्यांच्या या विधानाने वादाला तोंड फुटले आहे. या विधानाबद्दल भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांना सल्ला दिला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुण्यातील स्वारगेट येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेबद्दल माहिती दिली.

'मंत्री संजय सावकारे असे म्हणतात की, ही घटना पुण्यातच नाही, तर देशभरात अशा घटना घडतात. योगेश कदम म्हणाले की, तरुणीने प्रतिकार केला नाही म्हणून घटना घडली', असा मुद्दा माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर उपस्थित केला.

योगेश कदम, सावकारेंच्या विधानावर फडणवीसांचं उत्तर काय?

उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला असं वाटतं की, योगेश कदम जे बोलले, त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यात माझा स्वतःचा हा समज आहे की, ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की, हा गर्दी असणार भाग आहे. लोक होते. बस काही आतमध्ये नव्हती, बाहेरच होती. पण, प्रतिकार होताना लोकांना लक्षात आला नाही. असे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता."

"ते नवीन आहेत. तरुण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की, अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक संवेदनशीलपणे आपण बोलले पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली, तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. निश्चितपणे जे मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील. अशा प्रकारच्या घटनांबद्दल बोलताना त्यांनी संवेदनशीलपणे बोललं पाहिजे, असा माझा सल्ला असेल", अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

योगेश कदमांचं ते विधान काय, ज्यामुळे निर्माण झाला वाद?

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरूवारी (२७ फेब्रुवारी) पुण्यात माध्यमांशी बोलताना हे विधान केले होते. 

ते म्हणाले होते की, "विकृत विचाराचा एक पुरुष तिथे महिलेशी काहीतरी गोड बोलतो; दीड-दोन, चार मिनिटांमध्ये ब्रेन वॉशिंग करतो. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती सगळ्यांना आहे. अशा वेळी तिथे कोणतीही हाणामारी, तिथे कोणतेही वादविवाद, कुठलीही बळजबरी, असं काही घडलेलं नाही. जे काही घडलंय ते अतिशय शांतपणे झालेलं आहे. तिथे आरडाओरडा सुरू आहे. हाणामारी झाली आहे, असे काहीच घडलेले नाही. त्यामुळे आसपास असलेल्या सर्वसामान्यांदेखील ते कळले नाही", असे विधान कदम यांनी केले होते. 

कदमांकडून पीडितेलाच दोषी ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी टीका केली. या विधानाचे राजकीय वर्तुळात प्रतिसाद उमटले आहेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSwargateस्वारगेटPuneपुणेYogesh Kadamयोगेश कदमPoliceपोलिस