पुणे : राज्यात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. हे लक्षात घेता छत्रपती घराण्यातील कोणीतरी नेतृत्व करण्याची गरज असून भाजपाकडून खासदार झालेले छत्रपती संभाजी महाराज आणि खासदार उदयनराजे यांनी नेतृत्व करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रवीण गायकवाड यांनी पुण्यात केली. मात्र त्यापूर्वी त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय असेल, असेही ते म्हणाले.सध्या समाजाचा कोणत्याही राजकीय व्यक्तीवर विश्वास राहिला नसल्याने छत्रपतींच्या वंशजांनी पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबत संभाजी राजे यांच्याशी बोलणे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तर उदयनराजेंसोबत चर्चा झाली असून आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्यांचा निर्णय येणार असल्याचे ते म्हणाले.
छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजेंनी मराठा समाजाचं नेतृत्व करावे, मराठा क्रांती मोर्चाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2018 17:19 IST