नाशिक : केबीसी, विकल्पपाठोपाठ आता ओडिशातील मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने पैशांचे आमिष दाखवून येथील गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ फसवणूक झालेल्या गुंतवणूकदार व ठेवीदारांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून भद्रकाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात निवेदन दिले. विशेष म्हणजे या कंपनीने देशभरातील विविध शाखांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने जुलै २०१४ मध्ये कंपनीचा परवाना रद्द केला आहे़ भद्रकालीतील कॉम्प्लेक्समध्ये तीन वर्षांपासून कंपनीचे कार्यालय होते़ मात्र येथील कार्यालय महिनाभरापासून बंद असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}