शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 9:27 PM

भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिवाचा पोलिसांकडे तक्रार अर्ज

पुणे : अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांनी एल्गार परिषदेत ‘हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है’ आणि भारतीय न्यायव्यवस्था, कायदेमंडळ व प्रशासकीय व्यवस्था यांचा अपमान करत ’मी भारतीय संघराज्य मानत नाही’ अशी प्रक्षोभक विधान करून समाजात धार्मिक तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यांची ही विधाने भारतीय दंडसंहितेच्या 153अ व 295अ तसेच 124अ या कलमांनुसार गुन्हा ठरणारी आहेत. त्यामुळे उस्मानी यांच्यावर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी असा तक्रार अर्ज भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनला दिला आहे.

शनिवारी (दि.30) गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार, एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्य व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली, हिंदू समाज सडलेला आहे असे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केली आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशा स्वरूपाचा अर्ज आम्ही स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना दिला आहे. त्यांनी चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची कारवाई केली जाईल असे सांगितले आहे. मात्र आम्ही याचा पाठपुरावा करीत राहाणार असल्याचे अँड प्रदीप गावडे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.-------------------------------------

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चाHinduहिंदूPoliceपोलिसBJPभाजपाPoliticsराजकारण