शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवी गडकरविरोधात दोन महिन्यांत आरोपपत्र

By admin | Updated: August 11, 2015 02:21 IST

पूर्व मुक्त मार्गावर दारू पिऊन भरधाव गाडी चालवत दोघांचा बळी घेणारी विधी सल्लागार जान्हवी गडकरविरुद्ध सोमवारी कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांनी तब्बल ५६० पानी

मुंबई : पूर्व मुक्त मार्गावर दारू पिऊन भरधाव गाडी चालवत दोघांचा बळी घेणारी विधी सल्लागार जान्हवी गडकरविरुद्ध सोमवारी कुर्ला महानगर दंडाधिकारी न्यायालयात पोलिसांनी तब्बल ५६० पानी आरोपपत्र दाखल केले. दोन महिन्यांपूर्वी याच दिवशी ही दुर्घटना घडली होती.या अपघातप्रकरणी गडकरविरोधात सदोष मनुष्यवध, निष्काळजीपणे व दारू पिऊन भरधाव गाडी चालवणे यांसह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी जान्हवी घटनेआधी ज्या बारमध्ये बसली होती, तेथील सीसीटीव्ही चित्रण व तिने बारमध्ये के्रडिट कार्डद्वारे पैसे भरल्याचा तपशील आरोपपत्राला जोडला आहे. तसेच या अपघातात बळी गेलेल्या दोघांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांचा व अपघात झाल्यानंतर गाडीचा पंचनामा करणाऱ्या पोलिसांचा जबाबही आरोपपत्रात आहे. याव्यतिरिक्त ही घटना घडण्याआधी गडकरसोबत असलेल्या तिच्या मित्रांचे जबाब आहेत. अपघात झाला तेव्हा गडकर दारू प्यायली होती, याचा फॉरेन्सिक पुरावा आरोपपत्रात आहे.हे आरोपपत्र दाखल झाले तेव्हा गडकर आणि अपघातातील पीडितांचे नातेवाईक न्यायालयात होते. यावरील पुढील सुनावणी १२ आॅगस्टला होणार आहे. आरोपपत्र दाखल झाल्याने हे प्रकरण आता खटला चालवण्यासाठी सत्र न्यायालयात वर्ग करण्यात येईल. त्यानंतर तेथे न्यायालय सरकारी पक्ष साक्षीदारांची यादी सादर करण्यास सांगून खटल्याचे कामकाज सुरू होईल. पोलिसांनी दोन महिन्यांत याचे आरोपपत्र दाखल केल्याने आता याचा खटला किती दिवसांत सुरू होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा अपघात ९ जून २०१५ रोजी पूर्व दु्रतगती मार्गावर झाला. गडकर तिच्या आॅडी कारमधून या मार्गावरून भरधाव वेगाने गाडी चालवत मार्गिकेच्या विरुद्ध दिशेने जात होती. त्या वेळी तेथून जाणाऱ्या टॅक्सीला तिने धडक दिली. या टॅक्सीत सहा जण होते. या अपघातात मोहम्मद अब्दुल सय्यद (५५) व मोहम्मद सलिम सबूवाला (५०) यांचा बळी गेला.