शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मंडल कार्यालयाचा अनागोंदी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 01:27 IST

यवत मंडल अधिकारी कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला आहे.

यवत : यवत मंडल अधिकारी कार्यालयातील अनागोंदी कारभारामुळे शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला आहे. वारस नोंद, बँकाचा बोजा नोंदी व खरेदीच्या नोंदी होत नसल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. त्यातच मागील काही महिन्यांपासून येथे कायमस्वरूपी मंडल अधिकारी नसल्याने कारभार अतिरिक्त भार तात्पुरत्या अधिकाऱ्यावर सोपविला जात आहे. यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर कायमस्वरूपी मंडल अधिकारी नेमावा, अशी मागणी केली जात आहे.यवत मंडल अंतर्गत दौंड तालुक्याच्या पश्चिम भागातील यवत, खामगाव, नांदुर, कासुर्डी, बोरीऐंदी व भरतगाव ही गावकामगार तलाठी कार्यालये येतात. सदर तलाठी कार्यालयांतर्गत तालुक्यातील अनेक महसुली गावांचा कारभार चालतो. मागील आठ महिन्यांपासून या परिसरातील शेतकरी नोंदीसाठी अडचणी येत असल्याने त्रस्त आहे.दौंड महसूल विभागांतर्गत महसुलीदृष्ट्या महत्त्वपूर्ण असणारी अनेक गावे यवत मंडल अंतर्गत येतात. यातील बहुतांश गावे आता पुणे महानगर प्राधिकरण अंतर्गत येत आहेत. महसूल विभागाचा कार्यभार आॅनलाइन झाल्यापासून बदलेल्या तंत्रज्ञानाचा फायदा शेतकरीवर्गाला होऊन वेगाने कामे होतील, अशी अपेक्षा सर्वांना होती.मात्र, अगदी उलट पद्धतीने कारभार सुरू असल्याने याचा त्रास शेतकरीवर्गाला सहन करावा लागत आहे. सातबाऱ्यावर नोंदी कराव्यात, यासाठी वारंवार तलाठी कार्यालयात खेट्या मारण्याची वेळ शेतकरीवर्गावर आली आहे. सुरुवातीच्या काळात सर्व्हर जाम असल्याने नोंदी होत नसल्याच्या अडचणीला सामोरे जावे लागले. त्यानंतर आता नोंदी मंजूर करण्यासाठी मंडल अधिकारी उपलब्ध होत नसल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. नोंदीच होत नसल्याने अनेक महत्त्वपूर्ण कामे अडकून पडत आहेत.शेतकऱ्यांच्या अडचणीबरोबरच ई-सेवा केंद्रातून अनेक दाखले काढत असताना प्रतिज्ञापत्र करून द्यावे लागते. यासाठी प्रतिज्ञापत्रावर मंडल अधिकाऱ्याची सही आवश्यक असते. परंतु कायमस्वरूपी मंडल अधिकारी नसल्याने तेथेही अडचण निर्माण होते. यामुळे आता लवकरात लवकर कायमस्वरूपीचा मंडल अधिकारी नेमावा, अशी आग्रही मागणी परिसरातून केली जात आहे.>वास्तविक सातबारावर नोंदीसाठी अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत नोंद होणे आवश्यक असते. परंतु तसे न होता अनेक दिवसांच्या नोंदी रखडून राहत आहेत. १ जानेवारी २०१६ नंतरच्या अनेक नोंदीचे अर्ज असताना केवळ काहींच्या नोंदी झाल्या आहेत. प्रांत अधिकारी समीर शिंगटे व दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.केवळ त्या वेळी कार्यभार असणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांची भेट घेणाऱ्या अर्जदारांच्या नोंदी केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. यासाठी महसूल विभागातील दप्तर तपासल्यास यातील मधल्याअधल्या नोंदी कशा पद्धतीने होतात याची चौकशी तहसीलदार यांनी करून संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारणे गरजेचे आहे.