A chance of heavy rains in the Kokan, Central Maharashtra and Marathwada upcoming 3 days | कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता 
कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात ३ दिवस मुसळधार पावसाची शक्यता 

ठळक मुद्देमहाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यताविदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र झाले असून ते पूर्व पश्चिमेच्या दिशेला स्थिर झाले आहे़. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात तमिळनाडूच्या किनारपट्टी, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे़. त्यामुळे पुढील तीन दिवस गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. 
मंगळवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला़. 
गेल्या २४ तासांत फोंडत्त १२४, भोर ८६, पारनेर ८०, भिरा ७२, अहमदनगर ५८, दाभोलिम ४५, बीड ४०, गडचिरोली १९, परभणी २, पुणे ४२ मिमी पावसाची नोंद झाली होती़. 
हवामान विभागाने सोमवारी मतदानाच्या काळात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता़. पण सोमवारी सकाळनंतर बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती़. रात्री उशिरा पुणे, मुंबई तसेच सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात झाली़. कोकण, गोवा व मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडला़. 
मंगळवारी दिवसभरात महाबळेश्वर ३१, औरंगाबाद १, अकोला ५, अमरावती, बुलडाणा १ मिमी पावसाची नोंद झाली होती़. 
इशारा : २३ ऑक्टोबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे़. 
२४ ऑक्टोबरला कोकण, गोव्या तुरळक ठिकाणी जोदार पाऊस तर, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. २५ ऑक्टोबरला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोदार पा्वसाची शक्यता आहे़. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़. 
..........
पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ ते २६ऑक्टोबर दरम्यान सोसाट्याचा वारा, मेघगर्जनासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी चार दिवस पाऊस राहील़ अहमदनगर, पुणे, कोल्हापूर व सोेलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़ .बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात बुधवारी २३ आॅक्टोबरला मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे़.ऑ  तसेच ओरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरसह बीड व उस्मानाबाद जिल्ह्यात पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़. 
...........

Web Title: A chance of heavy rains in the Kokan, Central Maharashtra and Marathwada upcoming 3 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.