शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘डीटीएड’चे आव्हान

By admin | Updated: June 4, 2014 01:08 IST

गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांचा दुष्काळ झेलणार्‍या ‘डीटीएड’ (डिप्लोमा इन टीचर्स एज्युकेशन) अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसमोर यंदादेखील मोठे आव्हान आहे. जास्तीत जास्त प्रमाणात

महाविद्यालयांसमोर संकट : १६ जूनपर्यंत अर्ज विक्रीनागपूर : गेल्या चार वर्षांपासून सातत्याने विद्यार्थ्यांचा दुष्काळ झेलणार्‍या ‘डीटीएड’ (डिप्लोमा इन टीचर्स एज्युकेशन)  अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांसमोर यंदादेखील मोठे आव्हान आहे. जास्तीत जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांंचे प्रवेश व्हावे यासाठी  महाविद्यालयांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु जर यंदादेखील विद्यार्थ्यांचे प्रवेश कमी संख्येने झाले तर निश्‍चितपणे महाविद्यालयांसमोर  मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.नागपूर विभागात ‘डीटीएड’ अभ्यासक्रमाच्या जवळपास १0 हजार जागा आहेत. यात एकट्या नागपुरातच सव्वाचार हजार जागा  आहेत. २0१३-१४ या मागील वर्षीच्या प्रवेशप्रक्रियेदरम्यान फारच कमी विद्यार्थ्यांंनी अर्ज दाखल केले होते. महाराष्ट्र राज्य  शैक्षणिक प्रशिक्षण व संशोधन परिषदेतर्फे उशिरा सुरू झालेल्या प्रवेशप्रक्रियेवर याचे खापर फोडण्यात आले होते. यंदा मात्र विद्यार्थी दुसर्‍या अभ्यासक्रमांकडे वळू नयेत याकरिता परिषदेकडून प्रवेशप्रक्रिया २ जूनपासूनच सुरू करण्यात आली  आहे. अगोदर प्रवेशाचे अर्ज केवळ जिल्हा प्रशिक्षण संस्थांमध्येच मिळायचे. परंतु यंदा मात्र सर्वच ‘डीटीएड’ महाविद्यालयांना  अर्ज विक्रीची सूट देण्यात आली आहे. अशी स्थिती असली तरी संस्थाचालकांना प्रवेशाची चिंता सतावते आहे. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर रोजगार मिळण्याची हमी  नाही. त्यामुळे हजारो रुपये खर्च करून दोन वर्षांंचा अभ्यासक्रम करण्याऐवजी विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमांना प्राधान्य देत आहेत.  (प्रतिनिधी)‘बम्पर’ निकालाने जागविल्या आशादरम्यान, बारावीचा ‘रेकॉर्डब्रेक’ निकाल लागल्याने संस्थाचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील वर्षीपेक्षा  जवळपास १६ टक्क्यांनी निकाल वाढला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांंना प्रवेश देण्यासाठी संस्थाचालकांनी कंबर कसली आहे. यंदा  नक्कीच जास्त प्रमाणात प्रवेश होण्याची आशा आहे. परंतु विद्यार्थ्यांंना महाविद्यालयांपर्यंंत आणण्याची महाविद्यालयांत स्पर्धा  राहणार आहे.