लातूरच्या तहसीलदारांवर चाकूहल्ला

By Admin | Updated: June 17, 2014 03:41 IST2014-06-17T03:41:44+5:302014-06-17T03:41:44+5:30

तरस्त्याचा निकाल विरोधात दिल्याचा राग मनात धरून धोंडीराम लिंबाजी भद्रे (७४) याने लातूरचे तहसीलदार महेश शेवाळे यांच्यावर सोमवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या आवारात धारदार चाकूने हल्ला केला़

Chakahala on the Tahsildars of Latur | लातूरच्या तहसीलदारांवर चाकूहल्ला

लातूरच्या तहसीलदारांवर चाकूहल्ला

लातूर : शेतरस्त्याचा निकाल विरोधात दिल्याचा राग मनात धरून धोंडीराम लिंबाजी भद्रे (७४) याने लातूरचे तहसीलदार महेश शेवाळे यांच्यावर सोमवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या आवारात धारदार चाकूने हल्ला केला़ तहसीलदारांनी प्रसंगावधान राखून दोन्ही वार डायरी व ओळखपत्रावर झेलल्यामुळे त्यांच्या पोटावर किरकोळ जखमा झाल्या़ सोबतच्या कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले़ दरम्यान, सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध व्यक्त करून काळ्या फिती लावून कामकाज केले. शेवाळे सोमवारी सकाळी १०.२०च्या सुमारास कार्यालयाच्या पायऱ्या चढताना लातूर तालुक्यातील शिराळा येथील धोंडीरामने ‘तू माझ्या विरोधात निकाल का दिला?’ असे म्हणून चाकूने पोटावर दोन वार केले़ मोबाइल सुरू असतानासुद्धा प्रसंगावधान राखून शेवाळे यांनी दुसऱ्या हाताने डायरीवर चाकूचा वार झेलला़ नंतर पोटावर घसरल्याने शेवाळे यांच्या पोटावर किरकोळ जखमा झाल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Chakahala on the Tahsildars of Latur