शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षणाविनाच प्रमाणपत्र ?

By admin | Updated: June 29, 2016 04:59 IST

गृहरक्षक दलाच्या (होमगार्डस्) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत राज्यातील अर्धा डझन सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्रे अटींचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले.

डिप्पी वांकाणी,

मुंबई- गृहरक्षक दलाच्या (होमगार्डस्) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत राज्यातील अर्धा डझन सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्रे अटींचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले. जूनच्या प्रारंभी ही तपासणी करण्यात आली. यात काही केंद्रांत आवश्यक प्रशिक्षण साधने आणि पात्र प्रशिक्षक नसल्याचे दिसून आले. काही ठिकाणी तर चक्क वर्गखोल्याच नव्हत्या. यावरून ही केंद्रे पैसे घेऊन प्रशिक्षणाविनाच उमेदवारांना नोंदणीकृत सुरक्षारक्षक बनवीत असाव्यात, असा संशय बळावला आहे. वकील तरुणी पल्लवी पुरकायस्थ हिचा खून करणारा सज्जाद मोघूल हादेखील तिच्या अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. त्यामुळे या मुद्याला महत्त्व आले आहे. सुरक्षारक्षक बनू इच्छिणाऱ्याला प्रशिक्षण केंद्राकडून तो प्रशिक्षित सुरक्षारक्षक असल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. राज्यात ३५० सुरक्षा प्रशिक्षण केंद्रे असून, गृहरक्षक दलाकडून त्यांना परवाना दिला जातो.गृहरक्षक विभागाने परवान्यासाठी काही अटी घालून दिल्या असून, त्यानुसार केंद्रचालकांना त्यांच्याकडील प्रशिक्षक व त्यांचा अनुभव याची माहिती तसेच त्यांचे गेल्या तीन वर्षांतील आयकर विवरण सादर करणे बंधनकारक आहे. याशिवाय केंद्रचालकाला त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचे शपथपत्र द्यावे लागते. प्रशिक्षण केंद्रातील साधने, वर्गखोल्या, प्रशिक्षण आणि सरावासाठी केंद्रात मैदान आहे किंवा नाही याबाबतचीही माहिती सादर करणे अनिवार्य आहे. आम्ही अनेक संस्थांची तपासणी केली. तेव्हा काही ठिकाणी वर्गखोल्या आणि प्रशिक्षक नसल्याचे दिसून आले. उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी गरजेची असलेली दोरखंडासारखी मूलभूत साधनेही काही ठिकाणी उपलब्ध नव्हती. काही केंद्रांत उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी मैदानच नव्हते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.या संस्था प्रशिक्षणाशिवाय सुरक्षारक्षकाचे प्रमाणपत्र जारी करीत असल्याचा संशय आहे. काही केंद्रे १,००० ते ५,००० रुपयांच्या बदल्यात प्रशिक्षित सुरक्षारक्षकाची प्रमाणपत्रे देत असल्याची माहिती आम्हाला आमच्या स्रोतांकडून प्राप्त झाली असून, आम्ही त्याची चौकशी करणार आहोत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही काही मोजक्या परवान्यांचे नूतनीकरण केले असले तरी प्रशिक्षण केंद्रांसाठी उमेदवारांची पोलिसांकडून पडताळणी अनिवार्य करण्याबाबतही आम्ही विचार करीत आहोत, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. >प्रशिक्षणासाठी मूलभूत साधनेही नाहीतआम्ही अनेक संस्थांची तपासणी केली. तेव्हा काही ठिकाणी वर्गखोल्या आणि प्रशिक्षक नसल्याचे दिसून आले. उमेदवारांच्या प्रशिक्षणासाठी गरजेची असलेली दोरखंडासारखी मूलभूत साधनेही काही ठिकाणी उपलब्ध नव्हती. काही केंद्रांत उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी मैदानच नव्हते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.