शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेचे वाजले तीनतेरा

By admin | Updated: May 2, 2015 10:21 IST

अपमार्गे कल्याणच्या दिशेने येणाऱ्या एका मालगाडीचे इंजीन बदलापूर-अंबरनाथ स्थानकांदरम्यान फेल झाल्याची घटना शुक्रवारी घडली

डोंबिवली/अंबरनाथ : अपमार्गे कल्याणच्या दिशेने येणाऱ्या एका मालगाडीचे इंजीन बदलापूर-अंबरनाथ स्थानकांदरम्यान फेल झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यामुळे मध्य रेल्वेची कर्जत-कल्याण मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. या घटनेपाठोपाठ घाटकोपर स्थानकादरम्यान ओएचई ओव्हरहेड वायर) वर झाडाची फांदी पडल्यानेही तांत्रिक खोळंबा झाला होता. या दोन्ही घटनांमुळे लाखो प्रवाशांचे सुटीच्या दिवशी प्रचंड हाल झाले.मालगाडीची घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली, तर घाटकोपरची घटना दुपारी घडली. मालगाडीचे फेल इंजीन काढण्यासाठी कल्याण येथून इंजिनाच्या साहाय्याने आटोकाट प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केले, परंतु तरीही ते निघाले नाही. त्यामुळे अपची वाहतूक ठप्प तर डाऊनमार्गे येणारी वाहतूक नियमित वेळेने सुरू होती. सकाळच्या वेळेत झालेल्या या घटनेमुळे कल्याण ते कर्जत मार्गावरील हजारो प्रवासी स्थानकांमध्ये अडकून पडल्याचेही ते म्हणाले. ११ च्या सुमारास झालेल्या बिघाडावर दुपारी १ पर्यंत तोडगा न निघाल्याने रेल्वे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले होते. एकीकडे गर्दीवर नियंत्रण तर दुसरीकडे समस्येवर तोडगा काढत वाहतूक पूर्वपदावर आणणे, अशा दुहेरी पेचात रेल्वे अधिकारी सापडलेल्याचे होते. अखेरीस दुपारी १.२० च्या सुमारास अडकलेल्या मालगाडीच्या इंजिनाला दुसऱ्या एका इंजिनाच्या साहाय्याने पुढे खेचण्यात यश आल्याने ही कोंडी कशीबशी सुटली आणि हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. संध्याकाळी उशिरापर्यंत प्रवाशांना त्रास झाला.घाटकोपर स्थानका दरम्यान ओएचईवर झाडाची फांदी पडण्याच्या घटनेमुळेही म.रे. खोळंबली होती. त्याचा फटकाही प्रवाशांना बसला. दिवसभरातील या दोन्ही खोळंब्यामुळे प्रवाशांना मन:स्ताप झाला.रविवारचा मेगाब्लॉक रद्द करावा, अशी मागणीही प्रशासनाकडे केल्याचे देशमुख म्हणाले. हा घोळ सुरू असतांनाही रेल्वेने तिकीट वितरण सुरूच ठेवल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे बदलापूरमध्ये त्यांनी एकच गोंधळ करत बुकिंग कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला. स्थानिक प्रवासी संघटनेसह अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी यावर तोडगा काढल्यानंतर काही प्रवाशांना तिकिटाच्या पैशांचा परतावा (रिफंड) करण्यात आल्याचेही देशमुख म्हणाले.