शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्दैवी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 15:38 IST

शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्याबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्दैवी आहे.

बारामती : शेतकरी प्रश्नांबाबत केंद्र सरकारला स्वारस्य राहिलेले नाही. आठ-दहा वेळा झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. हा एकप्रकारे शेतकऱ्यांचा अपमान आहे. शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्याबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्दैवी आहे. त्यामुळे केंद्राचा निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टिका केली.

बारामती येथील अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सोमवार (दि. १८) पासून कृषि तंत्रज्ञान सप्ताह आयोजित केला आहे. या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार माध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आम्ही देखील सहभागी होणार आहोत. तसे पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला महाविकास अघाडीमधील तिनही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आंदोलनात सहभाग नोंदवत असताना मुंबईमध्ये गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपआपल्या तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन कारवीत. तर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना यश मिळाले आहे. कार्यक्रमा दरम्यान आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलचा विजय झाल्याचे सांगितले, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

या प्रकरणात पवारसाहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल... सामाजिक न्यायमंत्री धनंयज मुंडे यांच्यावर अत्याचाराच्या झालेल्या आरोपांची चौकशी सुरू आहे. ज्या महिलेने हे आरोप केले त्या महिलेवर भाजप, मनसेच्या नेत्यांबरोबरच विमानसेवा कंपनीतीन अधिकाऱ्याने देखील आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्यता पडताळूनच पुढील निर्णय घेण्यात येतील. हे पक्षाचे नेते शरद पवार यांनी सांगितले आहे, त्यामुळे या प्रकरणात पवार साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंयज मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत स्पष्ट केले. तर नामांतराच्या मुद्द्यावर आमच्यात मतमतांतरे आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर एकत्र बसून मार्ग काढण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारमध्ये जो कमान समान कार्यक्रम ठरला आहे. त्यानुसारच निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी पवार यांनी सांगितले.-------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी