शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडे मागणार २ हजार कोटी

By admin | Updated: January 14, 2015 04:05 IST

राज्यात सध्या निर्माण झालेल्या ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांचा साखर विकास निधी राज्याला द्यावा

मुंबई : राज्यात सध्या निर्माण झालेल्या ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने २ हजार कोटी रुपयांचा साखर विकास निधी राज्याला द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केंद्र सरकारला केली आहे. सूत्रांनी सांगितले की, या बाबतचा प्रस्ताव राज्याने दिला असून, मुख्यमंत्री या बाबत संबंधितांशी चर्चा करणार आहेत. २ हजार कोटी रुपयांचा निधी ऊस दरातील फरकापोटी शेतकऱ्यांना देण्यासाठी वापरण्यात येईल, अशी भूमिका राज्याने घेतली आहे. ही फरकाची रक्कम कारखान्यांमार्फत शेतकऱ्यांना दिली जाईल वा थेट शेतकऱ्यांना देखील दिली जाऊ शकते. या बाबत अंतिम निर्णय निधी मिळण्याबाबत खात्री झाल्यानंतर केला जाईल. ऊसदराचा प्रश्न हा राज्य सरकारमुळे निर्माण झालेला नाही. साखरेचे दर कमी झाल्याचा फटका साखर कारखान्यांना बसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. एफआरपीनुसार उसाला भाव देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. ते देण्यात येत असलेल्या अडचणींवर मात करण्याची भूमिका राज्याने घेतली असून, त्यासाठी केंद्र सरकारला साखर विकास निधीचे साकडे घातले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. साखर कारखान्यांना ऊस खरेदी कर माफ करणे हे राज्य सरकारच्या अखत्यारित आहे आणि तसा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील हे महत्त्वाच्या बैठकीसाठी रायपूरला गेले असल्याने मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीला उपस्थित नव्हते. ते ऊस दराबाबत राज्य शासनाची भूमिका बुधवारी जाहीर करणार आहेत. ऊस दराबाबत मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस येत्या दोन तीन दिवसांत दिल्लीला जातील, अशीही शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)