शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा पीक विम्यात समावेश करण्यासाठी केंद्राकडे आग्रह धरणार!

By admin | Updated: August 17, 2014 00:04 IST

बुलडाणा येथे जिल्हानियोजन बैठकीत उप मुख्यमंत्री अजीत पवार यांनी ग्वाही दिली.

बुलडाणा: सोयाबीनचा पीक विम्यामध्ये समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरल्या जाईल, अशी ग्वाही राज्याचे उप मुख्यमंत्री अजीत पवार यांनी शनिवारी येथे दिली. सोयाबीनच्या पेरणीचा कालावधी उलटल्याचे कारण पुढे करीत, पीक विमा कंपन्यांनी सोयाबीनला विम्याचा लाभ दिला नाही. ही बाब केंद्राच्या अखत्यारीत येत असून, या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीमध्ये चर्चा केली जाईल व केंद्राकडे आग्रह धरल्या जाईल, असे उप मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्ह्यातील पीक परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेस संबोधित करीत होते. पावसाअभावी बुलडाणा जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याची बाब आढावा बैठकीत समोर आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात पाऊस आला नाही, तर पिके माना टाकतील. या संदर्भात प्रशासन दक्ष असून, तसा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. राज्यातील जे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले, त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून, ३१ डिसेंबरनंतर चारा टंचाईबाबत निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांणी यावेळी स्पष्ट केले.सोयाबीन हे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे पीक असून, पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे यावर्षी इतर पिकांची लागवड करता आली नाही. दरम्यान सोयाबीनसाठीची पीक विम्याची मुदत उलटली. याबाबत शेतकर्‍यांनी तक्रारी केल्या असून, मंत्रीमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाल्यानंतर, केंद्राकडे आग्रह धरल्या जाईल, असेही ते म्हणाले.