सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

By Admin | Updated: May 29, 2014 03:31 IST2014-05-29T03:31:01+5:302014-05-29T03:31:01+5:30

सीबीएसई बोर्डाने चेन्नई आणि तिरूअनंतपुरम विभागाचा बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता उर्वरित सहा विभागांचा निकालदेखील बुधवारी जाहीर केला.

CBSE board exam results | सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर

 मुंबई : सीबीएसई बोर्डाने चेन्नई आणि तिरूअनंतपुरम विभागाचा बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता उर्वरित सहा विभागांचा निकालदेखील बुधवारी जाहीर केला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) मार्च २०१४ मध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेच्या दोन विभागांचे निकाल जाहीर झाले होते. त्यानंतर बुधवारी बोर्डाने अजमेर, पंचकुला, गुवाहाटी, अलाहाबाद, भुवनेश्वर आणि पाटणा या विभागांचा निकालही जाहीर केला आहे. भुवनेश्वर विभागाचा निकाल ८६.२५ टक्के लागला आहे. त्यामागोमाग अजमेर विभागाचा निकाल ८६.२२ टक्के लागला आहे. पंचकुला विभागाचा निकाल ८२.८४ टक्के एवढा लागला आहे. भुवनेश्वर विभागाने निकालात बाजी मारली आहे. अजमेर विभागाच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. या निकालाची टक्केवारी ९०.१९ एवढी आहे. गतवर्षीप्रमाणे या वर्षीही बोर्डाने निकालासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान विभागाच्या नॅशनल इन्फोमॅटिक सेंटरची मदत घेतली. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ६६६.१ी२४’३२.ल्ल्रू.्रल्ल, ६६६.ूु२ी१ी२४’३२.ल्ल्रू.्रल्ल, ६६६.ूु२ी.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर पाहता येतील.

Web Title: CBSE board exam results