शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वडाळा पोलिसांची सीबीआय चौकशी

By admin | Updated: June 18, 2014 05:17 IST

वडाळा पोलिसांच्या कोठडीत एका संशयिताचा मृत्यू झालेल्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयकडे सोपवला़ याचा गुन्हा येत्या ४८ तासांत नोंदवून चौकशी करावी

मुंबई : वडाळा पोलिसांच्या कोठडीत एका संशयिताचा मृत्यू झालेल्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयकडे सोपवला़ याचा गुन्हा येत्या ४८ तासांत नोंदवून चौकशी करावी व त्याचा अहवाल चार आठवड्यांत सादर करावा, असे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले़ न्या़ व्ही़एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ न्यायालय म्हणाले, पुरोगामी राज्यात अशा घटना घडणे खेदजनक आहे़ कारण गेल्या १४ वर्षांत कोठडीतील मृत्यू वाढले आहेत़ संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात याचे प्रमाण २३ टक्के आहे़तसेच वडाळा कोठडीतील मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी पळत असताना रेल्वेखाली आला व त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला़ मात्र याचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध नाही़ हे फूटेज तत्काळ डीलीट झाल्याचा दावा पोलिसांनी केला़ याचा अर्थ पोलीस चुकीचे पुरावे देऊन दिशाभूल करत आहेत. तेव्हा याचा तपास आता सीबीआयनेच करणे योग्य आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले़एप्रिल महिन्यात ही घटना घडली़ वडाळा पोलिसांनी सोनसाखळी व अंगठी चोरीच्या आरोपाखाली अँग्लो वल्डरीस, सुफीया मोहम्मद, मोहम्मद इरफान व अरबाझ खान यांना अटक केली़ त्या वेळी अँग्लोचा मृत्यू झाला़ मात्र अँग्लो कोठडीतून पळून जात असताना रेल्वेखाली सापडला व त्याचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांना केला़ (प्रतिनिधी)