वडाळा पोलिसांची सीबीआय चौकशी

By Admin | Updated: June 18, 2014 05:17 IST2014-06-18T05:17:59+5:302014-06-18T05:17:59+5:30

वडाळा पोलिसांच्या कोठडीत एका संशयिताचा मृत्यू झालेल्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयकडे सोपवला़ याचा गुन्हा येत्या ४८ तासांत नोंदवून चौकशी करावी

CBI inquiry by Wadala police | वडाळा पोलिसांची सीबीआय चौकशी

वडाळा पोलिसांची सीबीआय चौकशी

मुंबई : वडाळा पोलिसांच्या कोठडीत एका संशयिताचा मृत्यू झालेल्या प्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाने मंगळवारी सीबीआयकडे सोपवला़ याचा गुन्हा येत्या ४८ तासांत नोंदवून चौकशी करावी व त्याचा अहवाल चार आठवड्यांत सादर करावा, असे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले़
न्या़ व्ही़एम़ कानडे व न्या़ प्रमोद कोदे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ न्यायालय म्हणाले, पुरोगामी राज्यात अशा घटना घडणे खेदजनक आहे़ कारण गेल्या १४ वर्षांत कोठडीतील मृत्यू वाढले आहेत़ संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात याचे प्रमाण २३ टक्के आहे़
तसेच वडाळा कोठडीतील मृत्यू प्रकरणात संशयित आरोपी पळत असताना रेल्वेखाली आला व त्याचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला़ मात्र याचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध नाही़ हे फूटेज तत्काळ डीलीट झाल्याचा दावा पोलिसांनी केला़ याचा अर्थ पोलीस चुकीचे पुरावे देऊन दिशाभूल करत आहेत. तेव्हा याचा तपास आता सीबीआयनेच करणे योग्य आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले़
एप्रिल महिन्यात ही घटना
घडली़ वडाळा पोलिसांनी सोनसाखळी व अंगठी चोरीच्या आरोपाखाली अँग्लो वल्डरीस, सुफीया मोहम्मद, मोहम्मद इरफान व अरबाझ खान यांना अटक केली़ त्या वेळी अँग्लोचा मृत्यू झाला़ मात्र अँग्लो कोठडीतून पळून जात असताना रेल्वेखाली सापडला व त्याचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांना केला़ (प्रतिनिधी)

Web Title: CBI inquiry by Wadala police