शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाने पिचलेल्या शेतकऱ्यांचा ‘क’ वर्ग

By admin | Updated: February 10, 2015 02:19 IST

विदर्भ व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या, प्रापंचिक समस्यांनी गांजलेल्या आणि कर्जाच्या

संदीप प्रधान, मुंबईविदर्भ व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या, प्रापंचिक समस्यांनी गांजलेल्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली पिचलेल्या शेतकऱ्यांचा ‘क ’वर्ग निर्माण केला जाणार आहे. अन्नसुरक्षेपासून पेन्शनपर्यंत सर्व सरकारी योजनांचा लाभ मुख्यत्वे याच शेतकऱ्यांना देऊन त्यांना आत्महत्येपासून परावृत्त केले जाणार आहे.पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी फुलंब्री, पैठण व औरंगाबाद या परिसरातील ३० हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून अशा ‘क’ वर्गातील २ हजार शेतकऱ्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केली आहे. आता पुन्हा सर्वेक्षण करून अत्यंत अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार केली जात आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये राज्यात शेतकऱ्यांचा ‘क’ वर्ग शोधून काढण्याची आग्रही मागणी कदम यांची होती. यामुळे मागील मंत्रिमंडळ बैठकीत विदर्भ व मराठवाड्यातील प्रत्येकी एका जिल्ह्यात सर्वेक्षण करून कदम यांची कल्पना साकारते काय हे तपासणीचे आदेश दिले होते. शेतकऱ्यांकडून एकूण १५ प्रश्नांची उत्तरे घेतली जातील. यात कौटुंबिक माहितीसह, इतर उत्पन्नाचे साधन, बँक-सोसायटी-खासगी कर्ज, धार्मिक कार्य किंवा विवाहाची तरतूद, विम्याचे संरक्षण आणि कमावत्या व्यक्ती याचा समावेश असेल. हे सर्वेक्षण त्याच गावातील ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, अंगणवाडी सेविका व डॉक्टर करणार असल्याने फसवाफसवी करून ‘क’ वर्ग पदरात पाडून घेण्याची क्लृप्ती करण्यास वाव राहणार नाही. या सर्वेक्षणानंतर मोठ्या व सधन शेतकऱ्यांचा ‘अ’ वर्ग, आर्थिक परिस्थितीचे नेटके नियोजन केलेल्या शेतकऱ्यांचा ‘ब’ वर्ग आणि संकटात असलेल्या व कदाचित जीवनयात्रा संपवण्याचा विचार करू शकणाऱ्या शेतकऱ्यांचा ‘क’ वर्ग तयार केला जाईल. (प्रतिनिधी)