शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

वाशीममधील फाशीचे प्रकरण हायकोर्टात

By admin | Updated: June 23, 2014 01:14 IST

वाशीम येथील फाशीच्या शिक्षेचे प्रकरण शिक्कामोर्तबासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सादर करण्यात आले आहे. याप्रकरणातील आरोपीने अत्यंत निर्घृणपणे मृताचे मुंडके शरीरावेगळे करून

निर्घृणता : हत्येनंतर मृताचे मुंडके कापून जाळलेनागपूर : वाशीम येथील फाशीच्या शिक्षेचे प्रकरण शिक्कामोर्तबासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे सादर करण्यात आले आहे. याप्रकरणातील आरोपीने अत्यंत निर्घृणपणे मृताचे मुंडके शरीरावेगळे करून जाळले होते.रमेश जिजेबा लहाने (४२) असे आरोपीचे नाव असून तो दत्तानगर, वाशीम येथील रहिवासी आहे. वाशीम ग्रामीण पोलिसांनी रमेश व त्याची दुसरी पत्नी लक्ष्मीबाई ऊर्फ चतुरा (२९) या दोघांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. सत्र न्यायालयाने गेल्या ३ एप्रिल रोजी रमेशला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत मरेपर्यंत फाशी, तर कलम २०१ अंतर्गत ५ वर्षे कारावास व ३००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. लक्ष्मीबाईला सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सोडले. याप्रकरणात रामेश्वर काळबांडे, विठ्ठल तानपुरे व जयवंता लहाने यांनाही आरोपी करण्यात आले होते. परंतु, तपासात त्यांचा हत्येशी संबंध नसल्याचे आढळून आले. यामुळे त्यांना आरोपमुक्त करण्यात आले होते. मृताचे नाव विश्वनाथ लहाने असून तो कारंजी, ता. मालेगाव येथील रहिवासी होता. विश्वनाथ व रमेशमध्ये शेतीच्या सीमेवरून वाद होता. यामुळे रमेशने विश्वनाथचा काटा काढण्याचा कट रचला होता. ५ फेब्रुवारी २०१२ रोजी रात्री विश्वनाथ व रमेश यांनी एकत्र बसून मद्य प्राशन केले. यानंतर रमेशने विश्वनाथची गळा दाबून हत्या केली. यासाठी रमेशला लक्ष्मीबाईने मदत केल्याचा आरोप होता. हत्येनंतर रमेशने चाकूद्वारे विश्वनाथचे मुंडके वेगळे करून जाळले, तर उर्वरित शरीर झाकरवाडी शिवारातील प्रल्हाद काळबांडेच्या विहिरीत टाकले. हत्येच्या दिवसापासून विश्वनाथ बेपत्ता झाल्यामुळे त्याचा मुलगा शंकरने ७ फेब्रुवारी २०१२ रोजी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंदविली होती. ११ फेब्रुवारी रोजी आत्माराम काळबांडेने प्रल्हाद काळबांडेच्या विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती पोलिसांना दिली. याची माहिती शंकरला देण्यात आली. शंकरने घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटविली. पुरावे शोधण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते. श्वानामुळे मुंडके जाळलेल्या ठिकाणाचा शोध लागला. एका ठिकाणी काळे-पांढरे केस व राख, तर थोडे पुढे जबड्याचा भाग आढळून आला होता. (प्रतिनिधी)