कार्ल्यात एकवीरेचा जयघोष

By Admin | Published: March 27, 2015 12:21 AM2015-03-27T00:21:18+5:302015-03-27T00:21:18+5:30

बॅण्ड़़. तुताऱ्यांचा आवाज़़़ गुलालाची मुक्त उधळण व आई आयलो़़़ आई माउलीचा उदं उदं़़़ च्या गजराने एकवीरा देवीचा कार्ला गड गुरुवारी अक्षरश: दुमदुमून गेला होता़

Carlyat Ekwere's Glory | कार्ल्यात एकवीरेचा जयघोष

कार्ल्यात एकवीरेचा जयघोष

googlenewsNext

लोणावळा : पारंपरिक वाद्य व ढोल-ताशांचा गजऱ़़ बॅण्ड़़. तुताऱ्यांचा आवाज़़़ गुलालाची मुक्त उधळण व आई आयलो़़़ आई माउलीचा उदं उदं़़़ च्या गजराने एकवीरा देवीचा कार्ला गड गुरुवारी अक्षरश: दुमदुमून गेला होता़
महाराष्ट्राची कुलस्वामिनी व आराध्यदैवत असलेल्या आई एकवीरेचा पालखी सोहळा गडावर मोठ्या उत्साहात झाला़ लाखो भाविकांनी गडावर देवीचे व पालखीचे दर्शन घेतले़ दुपारपर्यंत कार्ला गडावर भाविकांची संख्या कमी होती. मात्र, पालखी मिरवणुकीला काही तास उरलेले असताना भाविकांनी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सायंकाळी ६ वाजता गडावर अक्षरश: पाय ठेवण्यास जागा उरली नव्हती़ दुपारी १२ वाजता देवीची चांदीची पालखी गडावर दाखल झाली़ अध्यक्ष अनंत तरे व विश्वस्त यांच्यासह पालखीचे मानकरी असलेले चौलचे आग्रावकर यांनी पालखीला खांदा लावला. या वेळी हजारो भाविकांनी आई एकवीरेचा जयघोष करत दर्शनाचा लाभ घेतला़
गुढी पाडव्यापासून देवीच्या
चैत्री यात्रेला सुरुवात झाली़
यात्रेच्या मुख्य दिवशी गुरुवारी सायंकाळी सप्तमीचा पालखी सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ या उक्तीप्रमाणे पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गडावर गर्दी केली होती़ मागील दोन दिवसांपासून गडावर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या़ कोकण परिसरातून आलेल्या देवीच्या शेकडो पालख्या, भक्तीत तल्लीन होऊन नाचणारे भाविक व बँडच्या आवाजात ‘आई माउलीचा उदं़़.उदं’चा गजर यामुळे परिसर दुमदुमला होता़
रीतीरिवाजाप्रमाणे पहाटे मंदिरात देवीचा अभिषेक करत पूजा व आरती करण्यात आली़ दुपारी ट्रस्टचे अध्यक्ष तरे यांच्या हस्ते आरती करण्यात आली़

४ या वर्षी प्रथमच भाविकांसाठी अत्याधुनिक दर्शनरांग, पायी पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांसाठी व व्हीआयपींसाठी प्रत्येकी वेगळी रांग करण्यात आल्याने सर्वांना सुलभपणे दर्शन घेता आले़ देवस्थानच्या वतीने क्लोज सर्किट टीव्ही विविध ठिकाणी लावण्यात आले होते.

Web Title: Carlyat Ekwere's Glory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.