शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

होम प्लॅटफार्मवरून सुटणार नाही गाडी

By admin | Updated: June 8, 2014 00:52 IST

पावसाळ्यात शेड नसल्यामुळे होम प्लॅटफार्मवरील प्रवाशांना पाण्यात भिजावे लागेल ही बाब प्रसार माध्यमांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने धावपळ करून दुरांतो

शेड नसल्याने पंचाईत : दुरांतो प्लॅटफार्म क्रमांक सहावरून सोडण्याचा निर्णयनागपूर : पावसाळ्यात शेड नसल्यामुळे होम प्लॅटफार्मवरील प्रवाशांना पाण्यात भिजावे लागेल ही बाब प्रसार माध्यमांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात  आणून दिली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने धावपळ करून दुरांतो एक्स्प्रेस १५ जून ते ३0 सप्टेबर २0१४ दरम्यान प्लॅटफार्म क्रमांक सहावरून  सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर पश्‍चिमेकडील भागात प्रवाशांची होणारी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी रेल्वेने होम प्लॅटफार्मची उपाययोजना केली. परंतु  सहा महिने होऊनही नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस वगळता इतर कुठल्याच रेल्वेगाड्या होम प्लॅटफार्मवरून सोडण्यात येत नसल्यामुळे होम प्लॅटफार्मचा  उद्देशच बारगळला होता. होम प्लॅटफार्मवर शेड नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. घाईगडबडीत तत्कालीन विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश  दीक्षित यांनी निर्णय घेऊन होम प्लॅटफार्मवरून दुरांतो एक्स्प्रेसचा शुभारंभ केला. ९ कोटी रुपये खर्च करून केवळ एकच गाडी सोडण्याच्या रेल्वे  प्रशासनाच्या निर्णयावर अनेकांनी आश्‍चर्यही व्यक्त केले होते. होम प्लॅटफार्म तयार करून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचा कुठलाच उद्देश सफल  झाल्याचे दिसत नव्हते. होम प्लॅटफार्मवर शेड नसल्यामुळे पावसाळ्यात दुरांतो एक्स्प्रेसही तेथून कशी सुटणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. प्रसारमाध्यमांनी ही बाब ‘डीआरएम’ ओ. पी. सिंह यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने धावपळ करून दुरांतोचाही प्लॅटफार्म  बदलविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या स्थितीत एकही गाडी होम प्लॅटफार्मवरून सुटत नसल्यामुळे रेल्वेचे ९ कोटी रुपये पाण्यात गेल्याची स्थिती असून रेल्वे प्रशासनाने एवढा खर्च  केलाच कशाला, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)