नागपुरात वाढतोय कॅन्सर

By Admin | Updated: December 2, 2014 00:34 IST2014-12-02T00:34:40+5:302014-12-02T00:34:40+5:30

मुंबई, पुणे, औरंगाबादच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. शहरात दर लाख लोकसंख्येतील ९४ महिला तर ८१ पुरुष या आजाराच्या विळख्यात आहेत.

Cancer growing in Nagpur | नागपुरात वाढतोय कॅन्सर

नागपुरात वाढतोय कॅन्सर

एक लाख लोकसंख्येपैकी ९४ महिला तर ८१ पुरुषांना कॅन्सर
नागपूर : मुंबई, पुणे, औरंगाबादच्या तुलनेत नागपुरात कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झपाट्याने वाढत आहे. शहरात दर लाख लोकसंख्येतील ९४ महिला तर ८१ पुरुष या आजाराच्या विळख्यात आहेत. यातील अनेक रुग्ण मृत्युपंथाला जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती आहे.
एस. रु ईकर इन्स्टिट्यूट आॅफ लेबर अ‍ॅण्ड सोशिओ कल्चरल स्टडीज, पीपल फॉर इंडिया, सोसायटी आॅन कॅन्सर अ‍ॅण्ड हेल्थ एज्युकेशन अ‍ॅण्ड इन्टस् मॅनेजमेंट, कॅन्सर आंदोलन समितीतर्फे आयोजित एकदिवसीय चर्चासत्रात हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. केंद्र सरकारने अलीकडेच देशातील आरोग्यासंबंधीचा अहवाल प्रकाशित केला आहे.
राज्यातील मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहराच्या तुलनेत नागपुरात कॅन्सर रुग्णांची संख्या अधिक असून, त्यात वाढ होत आहे. या शहरांमधील वैद्यकीय यंत्रसामग्री, उपकरणांचा तुलनात्मक अभ्यास केला तर नागपूरची परिस्थिती भयावह आहे. मुंबईच्या लोकसंख्येचा विचार केला तर एकट्या राजधानीत २२ हजार ८६४ कॅन्सर रु ग्णांची नोंद होत आहे. नागपुरात हेच प्रमाण ४३००, पुण्यात ५९२७ तर औरंगाबादेत २०६४ आहे. सर्वच प्रकारच्या कॅन्सर रु ग्णांची नोंद घेतली तर नागपुरात दर लाख लोकसंख्येपैकी ९४ महिला तर ८१ पुरु ष या जीवघेण्या रोगाने ग्रस्त आहेत. मुंबईतील पुरु षांमध्ये हे प्रमाण दर लाखात ९३ तर महिलांमध्ये ७१ आहे. पुण्यात ६२ महिला, ५२ पुरु ष तर औरंगाबादेत ४५ महिला व ३८ पुरु ष कॅन्सरग्रस्त होत आहेत. भविष्यात यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर एकट्या उपराजधानीत दर लाखात २२९ महिला तर १८२ पुरु ष कॅन्सरच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतात. मुंबईत ही आकडेवारी भविष्यात २०९ तर १५३ पर्यंत जाऊ शकते. विशेष म्हणजे नागपूरमधील दर लाखातील ० ते ६४ या वयोगटातील आठ पुरु ष तर सात महिला कॅन्सरग्रस्त होत आहेत. मुंबईत हे प्रमाण सात व सहा असे आहे, तर पुण्यातील सहा महिला व चार पुरु ष कॅन्सरग्रस्त होत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Cancer growing in Nagpur