शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

सीआरझेड रद्द करा

By admin | Updated: August 24, 2016 05:06 IST

महागिरी कोळीवाड्यातील कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड ) उठविण्यासाठी महागिरीवासीयांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

ठाणे : महागिरी कोळीवाड्यातील कोस्टल रेग्युलेशन झोन (सीआरझेड ) उठविण्यासाठी महागिरीवासीयांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. येथील ‘उमेद फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष नीलेश कोळी यांनी येथील नागरिकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष माधवी नाईक, नौपाडा मंडळ मच्छीमार सेल अध्यक्ष यशवंत कोळी आदींसह महागिरीवासीय उपस्थित होते. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून ठाण्याच्या खाडीकिनारी भागातील रासायनिक कंपन्यांमधील रासायनमिश्रित सांडपाणी तसेच शहराचे सांडपाणी खाडीत सोडले जात असल्याने कोळी बांधवांच्या पारंपरिक मासेमारी व्यवसायावर परिणाम होऊन संपूर्ण व्यवसाय बंद झाला. त्यामुळे येथील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच कोळीवाड्याला लगेच सीआरझेड लागू करण्यात आला. त्यामुळे विकासकामे थांबली आणि वाढत्या कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली. शिवाय जुन्या इमारती धोकादायक झाल्याने इमारत पडल्यावर पुनर्बांधणीचे संकटदेखील प्रत्येकाच्या समोर उभे आहे. मुंबई ही कोळ्यांची आहे. त्यांचा विकास केला जाईल, त्यांना जादा एफएसआय दिला जाईल, अशी घोषणा आधीच्या सरकारने केली होती. प्रत्यक्षात काही झाले नाही. त्यामुळे आपण मुख्यमंत्री या नात्याने ठाण्यातील कोळी बांधवांच्या या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा आणि सीआरझेड रद्द करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)>कोळीवाड्याव्यतिरिक्त शेजारीच असलेल्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलाच्या परिसरात खाडीकिनारी झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवून इमारत उभी केली जाते. तसेच लगतच पोलिसांच्याही शासकीय निवासस्थानाच्या इमारती उभारण्यात आल्या आहेत. >केवळ महागिरी कोळीवाड्यातच सीआरझेड लागू केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणची घरेही विकसित करता येत नाहीत. ही बाब शहरातील मूळचे रहिवासी असलेल्या कोळी बांधवांवर अन्यायकारक असून त्यांच्या हक्कांवर घाला घालणारी आहे, असेही या निवेदनात म्हटले आहे.