शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला मंत्रिमंडळाची मंजुरी

By admin | Updated: June 13, 2014 14:41 IST

दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असणा-या ठाणे जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाला अखेर मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १३ - दीर्घ काळापासून प्रतीक्षेत असणा-या ठाणे जिल्हा विभाजनाच्या प्रस्तावाला अखेर मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवल्याने आता ठाणे व पालघर असे दोन जिल्हे अस्तित्वात येतील. शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याबाबत लौकरच अधिकृत घोषणा करणार आहेत. 
नव्या जिल्ह्याचे मुख्यालय पालघर हे राहणार असून विभाजनाचे विधेयक आता विधिमंडळात मांडले जाईल. सुमारे दोन महिन्यात नवा जिल्हा अस्तित्त्वात येईल, असे समजते. प्रस्तावित नवीन जिल्ह्यात पालघर, वसई, डहाणू, तलासरी, जव्हार, वाडा, मोखाडा आणि विक्रमगड या आठ तालुक्यांचा समावेश असेल. तर मूळ ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड, शहापूर हे सात तालुके असतील. . 
सध्या अस्तित्वात असलेल्या ठाणे जिल्ह्याचे प्रचंड क्षेत्रफळ तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये निर्माण होणा-या अडचणी, नागरी सुविधांचा अभाव, कुपोषित बालकांचा प्रश्न इ. बाबी लक्षात घेऊन सर्वच राजकीय पक्षांनी जिल्हा विभाजनाची मागणी केली होती. विविध प्रश्नांनी येथील आदिवासी भाग होरपळत असून येथलाच जिल्हा व्हावा अशी मागणी सर्वसामान्यांतून पुढे येत होती, परंतु नानाविध कारणावरून हे विभाजन सतत रखडत होते.