सीए सीपीटी परीक्षेत प्रशस्ती लोहिया देशात दहावी

By Admin | Updated: July 17, 2014 01:45 IST2014-07-17T01:33:27+5:302014-07-17T01:45:05+5:30

अकोलाच्या शिरपेचात मानाचा तुरा

CA exams CPT exams in Lohia | सीए सीपीटी परीक्षेत प्रशस्ती लोहिया देशात दहावी

सीए सीपीटी परीक्षेत प्रशस्ती लोहिया देशात दहावी

अकोला : सनदी लेखापाल (सीए) परीक्षेची पहिली पायरी असलेल्या समाईक नैपूण्य चाचणी (सीपीटी) परीक्षेत अकोल्याच्या प्रशस्ती लोहियाने देशातून दहावा क्रमांक प्राप्त केला आहे. बुधवारी जाहीर झालेल्या निकालानुसार, सदर परीक्षेस बसलेल्या देशभरातील २ लाख विद्यार्थ्यांमधून प्रशस्तीने हे यश संपादन केले आहे. गतवर्षी सीएच्या अंतिम परीक्षेत, अकोला जिल्ह्यातील आकोट येथील गौरव श्रावगीने देशातून पहिला येण्याचा मान मिळविला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.
प्रशस्ती येथील लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. बारावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण प्राप्त केलेल्या प्रशस्तीला सीपीटी परीक्षेत कायदा या विषयात १00 टक्के गुण मिळाले आहेत. भविष्यात सनदी लेखापालाची पदवी मिळवून भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचा प्रशस्तीचा मानस आहे. प्रशस्तीचे वडील प्रशांत लोहिया हे स्वत: अकोल्यातील नावाजलेले सनदी लेखापाल आहेत, तसेच तिची आईदेखील सनदी लेखापाल आहे.

Web Title: CA exams CPT exams in Lohia