कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या बसला अपघात; चार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 12:29 IST2019-02-17T12:28:34+5:302019-02-17T12:29:07+5:30
सर्व प्रवासी प्रयागराजहून नागपूरला जात होते. वाटेत येताना मध्य प्रदेशमधील जबलपूरजवळील करोंदा नाल्यात ही बस उलटली.

कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या बसला अपघात; चार ठार
जबलपूर : कुंभमेळ्याहून नागपूरला परतणाऱ्या बस ओढ्यामध्ये पडल्याने झालेल्या अपघातात 4 जण ठार तर 46 जण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे साडे तीन वाजता ही दुर्घटना घडली.
सर्व प्रवासी प्रयागराजहून नागपूरला जात होते. वाटेत येताना मध्य प्रदेशमधील जबलपूरजवळील करोंदा नाल्यात ही बस उलटली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी अॅम्बुलन्स मागविल्या. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. करोंदा नाल्याच्या पुलावरून खाली पडलेल्या बसला क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहे.
अपाघातावेळी सर्व प्रवासी झोपेत होते. अनेकांच्या डोक्याला मार लागला आहे.