शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित कंपन्यांच्या जाहिरातींना दणका

By admin | Updated: January 12, 2015 03:38 IST

अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्डस् कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एएससीआय) ग्राहक तक्रार कौन्सिलकडून नुकत्याच केलेल्या सर्वेक्षण अहवालात १४४ जाहिरातींपैकी ११३ तक्रारींविरोधात दखल घेतली गेली

मुंबई : अ‍ॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्डस् कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एएससीआय) ग्राहक तक्रार कौन्सिलकडून नुकत्याच केलेल्या सर्वेक्षण अहवालात १४४ जाहिरातींपैकी ११३ तक्रारींविरोधात दखल घेतली गेली आहे. दखल घेण्यात आलेल्या ११३ जाहिरातींपैकी ६१ जाहिराती वैयक्तिक आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील होत्या; तर त्यापाठोपाठ ३३ जाहिराती शिक्षण क्षेत्रातील होत्या. आरोग्य आणि वैयक्तिक काळजी उत्पादने किंवा सेवांच्या ५८ जाहिरातदारांच्या जाहिरातीबाबतच्या दाव्यांमध्ये ग्राहक तक्रार कौन्सिलला त्या एकतर गैरसमज करून देणाऱ्या किंवा वैज्ञानिक सबळ नसलेल्या आणि एएससीआयच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आढळल्या. काही आरोग्यसेवा उत्पादने आणि सेवांच्या जाहिरातींनी औषधे आणि जादूटोणाविरोधी कायद्यांचे उल्लंघन केल्याचेही दिसून आले आहे. या जाहिरातींविरोधातील तक्रारींची दखल घेण्यात आली आहे.ग्राहक तक्रार कौन्सिलला ३३ शैक्षणिक क्षेत्रातील विविध जाहिरातदारांच्या जाहिरातींबाबतचे दावे सिद्ध झाले नसल्याचे आढळले. त्यामुळे एएससीआयच्या अ‍ॅडव्हर्टायझिंग आॅफ एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे या जाहिरातींविरोधातील तक्रारी ग्राह्य धरण्यात आल्या. (प्रतिनिधी)