शहरं
Join us  
Trending Stories
1
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
2
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
7
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
8
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
11
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
12
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
13
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
14
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
15
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
16
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
17
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडीलाही आता शॉकअ‍ॅब्सॉर्बर

By admin | Updated: December 6, 2014 00:32 IST

विद्यार्थिनींनी केली विज्ञानक्रांती : बैलांच्या मानेवरील वजन होणार कमी

वाई : बावधन येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शनात पश्चिम व दुर्गम भागातील श्री केदारेश्वर आकोशी माध्यमिक विद्यालयाच्या ‘श्रम परिहार’ बैलगाडी या वाहनासाठी तयार केलेल्या उपकरणाला द्वितीय पुरस्कार मिळाला. या उपकरणामुळे भविष्यात ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीना हे उपकरण फायदेशीर ठरणार असल्याची खात्री देण्यात येत आहे. बावधन, ता. वाई येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये वाई तालुक्यातील अनेक शाळांनी भाग घेतला होता. या प्रदर्शनात आकोशी, ता. वाई या पश्चिम व दुर्गम भागातील विद्यार्थिनींनी शेती व इतर साहित्य वाहतूक करणारी बैलजोडीवर चालणारी बैलगाडीच्या बैलाच्या खांद्यावर राहणाऱ्या जोकडाला दुचाकी वाहनाच्या हॅन्डेलसह खाली त्याला शॉकअ‍ॅब्सॉर्बर व पाईप आणि फिरते चाक जोडून केलेले उपकरण जोडून त्यामुळे बैलाच्या मानेवर बसणारा भार हलका होऊन याचा अधिक फायदा ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीस होईल. त्यासाठी आवश्यक बदल करण्यात येईल, असे सांगण्यात आले. शेतीसाठी बैलगाडी हे पारंपरिक विना इंधन बैलावर चालणारे वाहन आहे. आजही खेडेगावात त्याचा वापर तसेच ऊस वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. या उपकरणामुळे बैलाच्या खांद्यावर येणारा बोजा कमी होणार असून त्याला शॉकअ‍ॅब्झर असल्याने ते कोणत्याही रस्त्यावर चालणार आहे. ऊस वाहतुकीसाठी त्यात काही बदल करून त्याची प्रात्यक्षिक लवकर घेण्यात येणार आहे. प्रदर्शनाच्या शेवटी पहिल्या तीन क्रमांकाच्या शाळेस गटशिक्षण अधिकारी एच. व्ही. सणस, माजी सभापती दिलीप पिसाळ, उपशिक्षणाअधिकारी संगीता यादव यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सहदेव भणगे, मुख्याध्यापक विजय येवले यांनी व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. त्यांना मार्गदर्शन नितीन देसाई यांनी केले. (प्रतिनिधी) लवकरच प्रात्यक्षिक या उपकरणाचा ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीस अधिक प्रमाणात उपयोग होणार याबाबत आवश्यक ते बदल करून लवकरच त्याचे प्रात्यक्षिक किसनवीर कारखान्यावर घेण्यात येणार आहे. बैलगाडीत जादा वजन भरल्यास त्याचा भार बैलांच्या खांद्यावर यायचा, या उपकरणामुळे तो हलका होऊन बैलांना कष्ट व त्रास कमी होईल. बैलाच्या खांद्यावरच्या जोकडाची उंची व त्याला शॉकअ‍ॅब्झर असल्याने ते कोणत्याही रस्त्यावर वापरा येत आहे. महादेव भणगे, शेतकरी