शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मढ-वेसावे खाडीवर पूल झालाच पाहिजे

By admin | Updated: May 4, 2015 02:03 IST

वेसावे-मढ येथील आरामदायी पर्यायी फेरी बोटीचे रविवारी वेसावे बंदरावर राज्याचे शिक्षणमंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

मनोहर कुंभेजकर, वेसावेवेसावे-मढ येथील आरामदायी पर्यायी फेरी बोटीचे रविवारी वेसावे बंदरावर राज्याचे शिक्षणमंत्री आणि उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी येथील स्थानिकांनी मढ-वेसावे खाडीवर पूल झालाच पाहिजे, अशी मागणी केली. त्यावर येथे पूल बांधला जाईल, असे आश्वासन मंत्री तावडे यांनी दिले. या मागणीसाठी मढ, भाटी, एरंगळ, धारवली, आक्सा, येथील सुमारे एक हजार ग्रामस्थांनी जोरदार घोषणा देऊन जोरदार निदर्शने केली. त्यामुळे येथील फेरीबोट सेवा तीन तपास बंद पडली होती. मंत्री तावडे यांनी आश्वासन दिल्यानंतर ही सेवा पूर्ववत झाली, अशी माहिती मढ वेल्फेअर फाउंडेशनने ‘लोकमत’ला दिली. या वेळी तावडे म्हणाले की, संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर या ठिकणी पूल बांधण्यासंदर्भात या परिसरातील संबंधित कोळी बांधवांची बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीतच या मागणीवर सविस्तर चर्चा करून मार्ग काढला जाईल.खाडीवर पूल बांधल्यास येथील सुमारे २५ ते ३० हजार नागरिकांना चांगल्या शाळा आणि महाविद्यालये उपलब्ध होतील.तसेच कूपर, केइेएम, जेजे हॉस्पिटलदेखील जवळ येतील. मढ - वेसावे हे रस्त्याने सुमारे २० किमी अंतर कापण्यासाठी एक तास लागतो. या खाडीवर पूल बांधल्यास मढ -वेसावे हे अंतर ५ मिनिटांत पूर्ण करता येईल. येथील कोळी बांधवांचा मासेमारी व्यवसाय असल्यामुळे बर्फाच्या प्रति टनाला सुमारे ३५० रुपये तर डिझेल तेलावर ५० रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागत असल्याची माहिती आंदोलकांच्यावतीने मढ वेल्फेअर फाउंडेशनने यावेळी तावडे यांना दिली.