शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पतीसमोर प्रियकरासोबत पळाली नववधू!

By admin | Updated: August 17, 2014 00:44 IST

लग्न केले. पतीसोबत नऊ महिने सुखाचा संसारही केला. परीक्षेसाठी माहेरी गेली. १५ दिवसांनी पती न्यायला आला. प्रवासात तिने प्रियकरालाही बोलावले. इटारसी रेल्वेस्थानकावरून गाडी सुटताच प्रियकराला

लोहमार्ग पोलिसात सूचना : लग्नाला झाले होते नऊ महिनेनागपूर : लग्न केले. पतीसोबत नऊ महिने सुखाचा संसारही केला. परीक्षेसाठी माहेरी गेली. १५ दिवसांनी पती न्यायला आला. प्रवासात तिने प्रियकरालाही बोलावले. इटारसी रेल्वेस्थानकावरून गाडी सुटताच प्रियकराला जवळ बोलावले. आमचे १५ वर्षांपासून एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय राहूूच शकत नाही, असे ती आणि तिचा प्रियकर दोघांनीही तिच्या पतीला सांगितले. मग काय थोड्याच वेळात पतीच्या डोळ्यादेखत ती प्रियकराच्या हातात हात घालून निघून गेली.प्रमोद जीवनलाला शाहू (२९) रा. चमय्य, जि. निल्ललम हा तरुण बेंगळूरूच्या सॉफ्टवेअर कंपनीत डेव्हलपर म्हणून कामाला आहे. त्याचे नीलिमा (बदललेले नाव) या तरुणीसोबत २९ नोव्हेंबर २०१३ रोजी लग्न झाले. यातील तीन-चार महिने ती प्रमोद आणि त्यानंतर पतीच्या आईसोबत गुण्यागोविंदाने राहिली. १ मे रोजी परीक्षेच्या निमित्ताने ती आपल्या माहेरी जबलपूरला गेली. १० आॅगस्टला तिचा पती प्रमोद तिला घेण्यासाठी माहेरी गेला. चार-पाच दिवस सासूरवाडीत घालविल्यानंतर दोघेही पती-पत्नी बेंगळुरूला जाण्यासाठी निघाले. ते रेल्वेगाडी क्रमांक १२१९४ जबलपूर-यशवंतपूर एक्स्प्रेसच्या एस-५ कोचमध्ये १३ आणि १४ क्रमांकाच्या बर्थवर बसून प्रवास करीत होते. परीक्षेच्या दरम्यान माहेरी असताना नीलिमाची भेट आपल्या जुन्या प्रियकराशी झाली. दोघांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नीलिमाने आपल्या प्रियकरालाही आपण प्रवास करीत असलेल्या गाडीत बोलविले होते. इटारसी स्टेशनवरून गाडी सुटल्यानंतर नीलिमाने आपल्या प्रियकराला बोलविले. तो येताच दोघांनीही आमचे एकमेकांवर प्रेम असल्याचे प्रमोदला बोलून दाखविले. आपण प्रियकरासोबत जात असल्याचे नीलिमाने सांगितले आणि पतीच्या डोळ्यादेखत ती आपल्या प्रियकरासोबत फुर्र झाली. (प्रतिनिधी)सासरचे म्हणतात, मुलगी आमच्यासाठी मेलीपत्नी प्रियकरासोबत फुर्र होताच प्रमोदने आपल्या सासरच्या लोकांना मोबाईलवरून त्याची सूचना दिली. त्यावर त्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. मुलीने आमचे नाक कापले आहे, त्यामुळे आता ती आमच्यासाठी मेली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रमोदजवळ दिल्याचे त्याने सांगितले.