लाचखोर पोस्ट मास्तर सीबीआयच्या जाळ्यात

By Admin | Updated: June 19, 2014 22:24 IST2014-06-19T20:39:55+5:302014-06-19T22:24:43+5:30

कॉल लेटर देण्यासाठी उमेदवाराकडून आठशे रूपयाची लाख स्वीकारताना पोस्ट मास्तरला सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

Bribery postmaster trap in CBI | लाचखोर पोस्ट मास्तर सीबीआयच्या जाळ्यात

लाचखोर पोस्ट मास्तर सीबीआयच्या जाळ्यात

बुलडाणा : तालुक्यातील रायपूर येथे कॉल लेटर देण्यासाठी उमेदवाराकडून आठशे रूपयाची लाख स्वीकारताना पोस्ट मास्तरला सीबीआयच्या पथकाने आज १८ जून रोजी दुपारी ४ वाजता रंगेहाथ पकडले. बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील पोस्ट कार्यालयात पोस्ट मास्तर म्हणून आत्माराम तुकाराम झगरे (वय ५२) कार्यरत आहे. त्याने घरातच पोस्ट कार्यालय थाटले आहे. काही दिवसांपूर्वी गावातील अरूण भोसले (वय २२) या युवकाने मुंबईच्या पोस्ट विभागात चालक या पदासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जानुसार त्याला रायपूर येथील पोस्ट कार्यालयात कॉल लेटर आले होते; परंतु लाचखोर पोस्ट मास्तर झगरे यांनी हे कॉल लेटर हेतुपुरस्सर पैशासाठी दाबून ठेवले. कॉल लेटर आल्याची माहिती मिळताच अरूण भोसलेने बुलडाण्यातील पोस्ट विभागात चौकशी केली असता, सदर कॉल लेटर हे रायपूर पोस्ट कार्यालयात पाठविल्याचे त्याला सांगितले. याबाबत त्याने गावातील पोस्ट मास्तरकडे चौकशी केली असता त्यावेळी पोस्ट मास्तरने मुंबई येथील पोस्ट विभागात माझी ओळखी आहे. त्यामुळे तुझे कॉल लेटर मी हातोहात घेऊन आलो आहे; परंतु कॉल लेटर देण्यासाठी तुला पाच हजार रूपये द्यावे लागतील, असे सांगितले; परंतु तडजोड केल्यानंतर एक हजार रूपये देण्याचे ठरविण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी अरूण भोसले याने बुलडाणा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्यासाठी धाव घेतली; परंतु पोस्ट कार्यालय हे केंद्रांतर्गत येत असल्याने तुम्हाला सीबीआयकडे तक्रार दाखल करावी लागेल, असे त्याला सांगण्यात आले. त्यानुसार अरूणने नागपूर येथील सीबीआयकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सीबीआयच्या पथकाने रायपूर येथील पोस्ट कार्यालयाच्या परिसरात आज सापळा रचला. यावेळी अरूण भोसलेकडून आठशे रूपयाची लाच स्वीकारताना पोस्ट मास्तर झगरे यास रंगेहाथ पकडले; तसेच पुढील कार्यवाहीसाठी नागपूरला सोबत नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Web Title: Bribery postmaster trap in CBI