लाचखोर उपअभियंता अटकेत

By Admin | Updated: June 19, 2014 03:06 IST2014-06-19T03:06:02+5:302014-06-19T03:06:02+5:30

कायदेशीर सोपस्कार झाल्यानंतर रात्री उशिरा वाईकर यांना अटक होणार होती.

The bribe sub-inspector | लाचखोर उपअभियंता अटकेत

लाचखोर उपअभियंता अटकेत

नाशिक : येवला तालुक्यातील आंबेगाव येथील स्मशानभूमी व गाव रस्त्यांचे बारा लाखांचे देयक मंजुरीसाठी ठेकेदाराकडून २५ हजारांची लाच घेताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे येवला उपअभियंता वसंत बबन वाईकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
कायदेशीर सोपस्कार झाल्यानंतर रात्री उशिरा वाईकर यांना अटक होणार होती.
आंबेगाव येथील मनोज शांताराम गिते या बांधकाम ठेकेदाराने गावातील स्मशानभूमीच्या काँक्रीटीकरणाचे पाच लाखाचे व गावातील प्रभाग क्र. ३, ४ व ५ मधील रस्ता काँक्रीटीकरणाचे सात लाखांचे असे एकूण बारा लाखांचे देयक मंजुरीसाठी उपअभियंता वाईकर यांच्याकडे पडून होते. सदर देयकांच्या मंजुरीसाठी २५ हजारांची लाच गिते यांच्याकडे मागितली होती, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक नजीर शेख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: The bribe sub-inspector