Born as Baramati, he named the baby "Narendra". | ...म्हणुन बारामतीत जन्मलेल्या ' त्या ' बाळाचे नाव ठेवले  '' नरेंद्र ''
...म्हणुन बारामतीत जन्मलेल्या ' त्या ' बाळाचे नाव ठेवले  '' नरेंद्र ''

बारामती : बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. प्रबळ विरोधक मानल्या जाणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी हा किल्ला डळमळीत करण्यासाठी जंगजंग पछाडले. मात्र,विरोधक यशस्वी ठरले  नाहीत.याच बारामतीत एका मोदी समर्थकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेणार असल्याच्या दिवशी आज जन्माला आलेल्या त्याच्या भावाच्या मुलाचे नावच '' नरेंद्र '' ठेवले आहे. मोदी गुरुवारी(दि ३०) दिल्ली येथे राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित कार्यक्रमात दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत.आजच्याच दिवशी येथील गोविंद देवकाते यांचे भाऊ शेखर यांच्या पत्नीला सकाळी मुलगा झाला. त्यांनी आजच्या दिवशी मोदी दुसऱ्यांदा शपथ घेणार असल्याचे सांगत त्यांच्या घरात जन्मलेल्या मुलाचे नामकरण नरेंद्र असे केल्याचे सोशल मीडियावर शेअर केले.त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात आले  आहे.काहींनी अभिनंदन  नमो नमो अशा शब्दांत त्यांच्या कुटुंबाच्या निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक केले. याबाबत धनगर प्रबोधन संघाचे अध्यक्ष गोविंदराव देवकाते यांनी लोकमत शी बोलताना सांगितले की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम पाहतो.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा,कार्याचा माझ्यावर, कुटुंबावर प्रभाव आहे.त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे देशात आज ते दुसऱ्यांदा शपथ घेत आहेत.त्यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले आहे.त्यामुळे त्यांच्या विचारांचा वारसा घेवुन आमच्या घरात जन्म घेतलेल्या बाळाने देशासाठी काम करावे.या भूमिकेतुन मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत असलेल्या दिवशी बाळाचे नाव नरेंद्र ठेवल्याचे देवकाते यांनी सांगितले.
———————————————


Web Title: Born as Baramati, he named the baby "Narendra".
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.